Sameer Amunekar
शिरोडा बीच स्वच्छ व कमी गर्दीचा असल्याने विदेशी पर्यटकांना येथे निवांतपणे समुद्रस्नान करता येते.
या बीचवरील वाळू मऊ व स्वच्छ असल्यामुळे चालणे, उन्हात बसणे आणि रिलॅक्स होण्यासाठी उत्तम ठरते.
बहुतांश काळ समुद्राची लाट सौम्य असते, त्यामुळे आंघोळीसाठी हा किनारा तुलनेने सुरक्षित मानला जातो.
नारळ-सुपारीची झाडे, निळसर समुद्र आणि स्वच्छ आकाश यामुळे विदेशी पर्यटकांना ‘ट्रॉपिकल व्हायब’ अनुभवता येतो.
मोठ्या पर्यटन केंद्रांसारखा गोंगाट नसल्याने शांतता शोधणाऱ्या विदेशी पर्यटकांची शिरोडा बीचला विशेष पसंती असते.
स्थानिक नागरिकांचा आदरातिथ्यपूर्ण व मदतीचा स्वभाव विदेशी पर्यटकांना आपुलकीची भावना देतो.
शिरोडा बीचवरील सूर्यास्त अतिशय मनमोहक दिसतो; समुद्रात आंघोळीनंतर हा अनुभव पर्यटकांसाठी अविस्मरणीय ठरतो.