Goa Tourism: विदेशी पर्यटक योगासनांत मग्न!

विदेशी पर्यटक आरोग्‍य निरोगी व निरामय राहण्‍यासाठी किनारी भागात पहाटेच्‍या वेळी योगासने करताना दिसतात.
Goa Tourism |Foreign tourist
Goa Tourism |Foreign touristDainik Gomantak

Goa Tourism: देश-विदेशातील पर्यटक गोव्‍याच्‍या समुद्रकिनारी भागात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. मात्र काही पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्याबरोबरच आपले जीवन, आरोग्‍य निरोगी व निरामय राहण्‍यासाठी किनारी भागात पहाटेच्‍या वेळी योगासने करताना दिसतात.

मांद्रे मतदारसंघातील मोरजी, आश्‍‍वे, मांद्रे, हरमल या किनारी भागात हे दृश्‍‍य सध्‍या दिसत आहे. ‘योग’ ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. याबाबत बोलताना रशियन नागरिक टिटू अलेक्‍झांडर यांनी सांगितले की, नेहमी योगासने करा आणि आपले आयुष्य निरोगी व आनंदी ठेवा. तसेच वेगवेगळ्या रोगांपासून दूर रहा.

जो नेहमी योगासने करतो त्याचे शरीर सदृढ व मन प्रसन्न राहते. योगा हे एक शास्‍त्र आहे, जे आपले शरीर, मन आणि आत्‍म्‍याचे एकत्रितरीत्या संतुलन घडविते. योग हे एक प्राचीन भारतात उगम पावलेले आध्यात्मिक आणि शारीरिक शास्त्र आहे. पूर्ण विश्वात योगाला महत्त्व दिले जाते. म्हणूनच प्रत्येक जण पहाटे योगासने, सूर्यनमस्कार करत असल्याचे चित्र दिसते.

मांद्रे मतदारसंघातील किनारी भागात सकाळी दररोज लोक मॉर्निंग वॉकसाठी येतात. काही लोक धावताना दिसतात तर काही लोक व्‍यायायाचे विविध प्रकार सादर करताना दिसतात. मात्र विदेशी पर्यटक योगासनांत मग्न असतात.

रेतीवर चटई किंवा चादर टाकून ते योगाचे विविध प्रकार करतात. विशेष म्‍हणजे या प्रत्‍येक पर्यटकाचे आरोग्‍य आणि शरीरयष्‍टी बळकट असल्‍याचे दिसून येते. महिला पर्यटकही योगासने करून आरोग्‍याला पहिले प्राधान्‍य देतात.

Goa Tourism |Foreign tourist
Goa News: खोर्ली-उसपकर जंक्शनवर नाल्याचे काम सुरू

योग म्‍हणजे पूर्ण जीवनशैली

भारतीय योग शास्त्रामध्ये पाच योग सांगितले आहेत. त्‍यात ज्ञानयोग, हठयोग, कुंडलिनी जागृतीकर्म योग, भक्तियोग आणि राजयोग. योगाचा मूळ सिद्धान्त ध्यान आणि आसनांच्या माध्यमातून दैहिक, मानसिकता प्राप्त करणे होय. योग एक पूर्ण विज्ञान, एक पूर्ण जीवनशैली, एक पूर्ण चिकित्सा पद्धती आणि एक पूर्ण अध्यात्म विद्या आहे.

योग मनुष्याला सकारात्मक चिंतनाच्या प्रशस्त मार्गावर आणण्यासाठी एक अद्भुत विद्या आहे, जिला हजारो वर्षपूर्वी भारताच्या प्रज्ञावान ऋषी-मुनींनी आविष्कृत केले आहे.

जेव्हा मनाला एकाग्र करून ध्यानावस्थित रूपात जीव परमात्म्याबरोबर मीलनाची आकांक्षा करत असते, तोच योग होय. योगासनांना आधुनिक जीवनात फक्त व्यायामच मानले जाते. योगाचा प्रमुख उद्देश हाच की, मनुष्याला मानव जीवनाचे परम लक्ष्य म्‍हणजे मोक्ष प्राप्त करणे होय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com