Foreigner Arrested in Goa: गोव्यात राहायचं तर कायदेशीर कागदपत्रं सोबत ठेवा!! मांद्रेत परदेशी नागरिक कायद्याचे उल्लंघन; एकाला अटक

Foreign Nationals in India: पोलिसांनी एका परदेशी नागरिकाला थांबवून त्याची ओळख आणि भारतात राहण्यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर तपासणी केली होती
foreigner arrested in Goa
foreigner arrested in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मांद्रे: उत्तर गोव्याच्या किनारी भागात सोमवार (२४ मार्च) रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास पोलिसांनी एका परदेशी नागरिकांची तपासणी केली. मांद्रे पोलीस ठाण्यात एक गुन्हा नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अभिषेक चोडणकर यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आणि तक्रारीनुसार, सकाळी ११:३० च्या सुमारास पोलिसांनी एका परदेशी नागरिकाला थांबवून त्याची ओळख आणि भारतात राहण्यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर तपासणी केली होती.

पोलीस तपासणीच्या वेळी त्याने त्याचे नाव डेनिस अलेक्झांडर सेबन वय ३८ वर्षे, रहाणारा मोल्डोव्हा असं म्हणत सध्या तो खळचवाडा, हरमल,पेडणे इथे वास्तव्य करत असल्याचे सांगितले.

foreigner arrested in Goa
Goa Crime: गळा चिरुन डोकं केलं वेगळं; आठ वर्षापूर्वीच्या खून प्रकरणातील संशयिताची जन्मठेप रद्द

मात्र तपासणीत डेनिस सेबन नावाचा परदेशी माणूस गोव्यात येथे वैध प्रवास कागदपत्रांशिवाय बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याचे आढळून आलेय. याचाच अर्थ त्याने परदेशी नागरिक कायदा, १९४६ चे उल्लंघन केले आहे.

या प्रकरणी मांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६/२०२५, परदेशी नागरिक आदेश १९४८ च्या कलम ७(१)(३) आणि परदेशी नागरिक कायदा १९४६ च्या कलम १४ अन्वये नोंदवण्यात आला आहे. डेनिस अलेक्झांडर सेबन याला दुपारी ३ वाजता अटक करण्यात आलीय. अटकेदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले आणि सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिषेक चोडणकर करत आहेत.

या घटनेमुळे गोव्यातील परदेशी नागरिकांच्या वास्तव्याच्या कायदेशीरतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी डेनिस सेबन यांनी भारतात येण्यासाठी किंवा येथे राहण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही कायदेशीर कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे, त्यांना बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

foreigner arrested in Goa
Goa Assembly: गोव्याचं काँक्रीट जंगल होतंय, लोकांची टॅंकरवर भिस्त; पाणीटंचाईवरून विरोधकांचा हल्लाबोल

गोव्यातील परदेशी नागरिकांच्या वास्तव्यावर पोलिसांची करडी नजर आहे. परदेशी नागरिकांनी भारतात वास्तव्यास असताना आवश्यक असलेली सर्व कायदेशीर कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा, त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. गोवा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर, आरोपीला न्यायालयासमोर हजर केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com