Ponda: फोंड्यात चतुर्थी बाजार फुलला..., मंत्री रवी नाईक व सुभाष शिरोडकर खरेदीसाठी बाजारात

Ponda Market: फोंड्यात काल चतुर्थी बाजाराचे उद्‍घाटन दोन मंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. फोंडा बसस्थानकावरील झरेश्‍वर गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात हा चतुर्थी बाजार भरला
Ponda
PondaDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: फोंड्यात काल चतुर्थी बाजाराचे उद्‍घाटन दोन मंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. फोंडा बसस्थानकावरील झरेश्‍वर गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात हा चतुर्थी बाजार भरला असून कृषिमंत्री रवी नाईक व सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते या बाजाराचे उद्‍घाटन करण्यात आले.

अस्तुरी एमसीएलएफ संस्थेतर्फे सहकार खाते व डीआरडीएच्या सहकार्याने हा चतुर्थी बाजार आयोजित करण्यात आला होता. यावेळी रवी नाईक व सुभाष शिरोडकर मंत्रीद्वयांसोबत सहकार निबंधक आशुतोष आपटे, अस्तुरी संस्थेच्या डॉ. गौरी शिरोडकर तसेच शुभम शेट, शुभम भर्तू तसेच शिल्पा होन्नावर, रश्‍मी नाईक, झरेश्‍वर गणेशोत्सव मंडळाचे रोहिदास नाईक व इतर पदाधिकारी उपस्थित होत्या. स्वागत व प्रास्ताविक डॉ. गौरी शिरोडकर यांनी केले.

Ponda
Goa Drug Case: 'स्‍विगी डिलिव्हरी बॉय' निघाला ड्रग्स तस्कर, सांकवाळमध्‍ये 22 हजाराच्या गांजासह एकाला अटक

चतुर्थी बाजारात कृषिमंत्री रवी नाईक व सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी खरेदी केली. रवी नाईक यांनी बाजारात उपलब्ध अनेक वस्तूंबद्दल समाधान व्यक्त करून गोमंतकीयांनी अशाप्रकारच्या उपक्रमांना सहकार्य करण्याची गरज व्यक्त केली.

गोमंतकीय वस्तूंना प्राधान्य द्यावे ः शिरोडकर

गोमंतकीय वस्तूंना गोमंतकीयांनी प्राधान्य द्यावे. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. यासाठी सरकार अशा उपक्रमांना प्रोत्साहन देत असून त्याचा लाभ गोमंतकीय महिलांनी घ्यावा, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.

Ponda
Illegal Mining in Goa: फोंडा पोलिसांची धडक कारवाई! मरड धारबांदोडा येथील बेकायदा चिरेखाणीवर छापा, मजुरांनी काढला पळ

स्वयंपूर्णतेचे महत्त्व महिलांना कळले: रवी

स्वयंपूर्णतेमुळे संसाराला हातभार लावताना स्वतः आत्मनिर्भर होत असल्याने गोमंतकीय महिलांना स्वयंपूर्णतेचे महत्त्व कळले आहे. शिक्षणामुळे माणूस समृद्ध होतो, त्यामुळे महिलांनी अशा उपक्रमातून मिळणाऱ्या लाभाचा उपयोग स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरावा असे आवाहन करताना सरकार आणि स्वयंसाहाय्य गटांच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन दिले जात आहे, त्याचा लाभ घ्यावा, असे रवी नाईक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com