पणजी: गोव्याची 'फ्लाय 91' विमान कंपनी गोवा ते पुणे आणि सिंधुदुर्ग ते पुणे दरम्यान थेट विमानसेवा सुरू होणार आहे. गोवा-पुणे-गोवा मार्गावर शनिवार आणि रविवारी दोन दिवस दोन्ही मार्गावर विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. येत्या 31 ऑगस्टपासून ही विमानसेवा सुरु होणार आहे.
मूळ गोव्याची असणारी 'फ्लाय 91' विमान कंपनीने गेल्या काही महिन्यांपूर्वी विमानसेवा सुरु केली. गोवा, हैद्राबाद, आगात्ती, बंगळुरु, जळगाव, पुणे आणि सिंधुदुर्ग या शहरांना जोडणाऱ्या विमान सेवेचे घोषणा केली.
सुरुवातीला गोवा, हैद्राबाद, बंगळुरु, जळगाव आणि आगात्ती येथे सेवेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानतंर आता सेवेचा विस्तार केला जात असून, पुणे शहराला जोडणाऱ्या फ्लाईट्स येत्या ३१ ऑगस्टपासून सुरु होत आहेत.
असे आहे वेळापत्रक (Fly 91 Flight Time Table)
फ्लाइट IC 13769 (GOX-PNQ) मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथून सकाळी 6.35 वाजता उड्डाण करेल आणि सकाळी 7.40 वाजता पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचेल.
फ्लाइट IC 1375 (PNQ-GOX) पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी 10:55 वाजता उड्डाण करेल आणि दुपारी 12:10 वाजता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे उतरेल.
‘फ्लाय 91’ आठवड्याच्या अखेरीस सिंधुदुर्ग-पुणे दरम्यान थेट विमानसेवा सुरू करत आहे. यामध्ये फ्लाइट IC 5302 (PNQ-SDW) हे पुणे विमानतळावरून सकाळी 8.05 वाजता उड्डाण करेल आणि 9.10 वाजता सिंधुदुर्ग विमानतळावर उतरेल आणि IC 5303 (SDW-PNQ) सकाळी 9.30 वाजता सिंधुदुर्ग विमानतळावरून टेक ऑफ करेल आणि सकाळी 10.35 वाजता पुणे विमानतळावर लँड करेल.
नव्याने सुरु झालेली विमानसेवा गोवा आणि सिंधुदुर्ग दरम्यान पर्यटनाच्या नवीन संधी उपलब्ध करून देईल, असे ‘फ्लाय 91’ चे एमडी आणि सीईओ मनोज चाको म्हणाले आहेत.
Fly 91 Flight booking Ticket Rate
फ्लाय 91 द्वारे गोवा किंवा सिंधुदुर्गातून पुण्याला येण्यासाठी १,९९१ रुपये मोजावे लागतील. तर पुण्यातून सिंधुदुर्गला जाण्यासाठी २,४९२ रुपये आणि गोव्याला जाण्यासाठी ४,७९२ रुपये मोजावे लागतील. (फ्लाय 91 च्या संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेले हे दर केवळ ३१ ऑगस्टसाठीचे आहेत)
गोव्याच्या असणाऱ्या फ्लाय ९१ ने कंपनीने विमानसेवा सुरु झाल्यानंतर गोवा ते पुणे आणि सिंधुदुर्ग ते पुणे विमानसेवा सुरु करण्याचे संकेत दिले होते. अखेर या विमानसेवेला मुहूर्त मिळाला असून, येत्या ३१ ऑगस्टपासून विमानसेवा सुरु होणार आहे. नव्या फ्लाईट्सबाबत कंपनीच्या fly91 या संकेतस्थळावर जावून माहिती घेता येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.