Sindhudurg-Pune Flight: येवा कोकण आपलोच आसा! सिंधुदुर्ग–पुणे विमानसेवा आता आठवड्यातून 5 दिवस; पर्यटनाला मिळणार बूस्टर

Sindhudurg-Pune FLY 91 Flight: 'फ्लाय ९१' या विमान कंपनीनं सिंधुदुर्ग-चिपी विमानतळ ते पुणे या मार्गावरील विमानसेवा आता आठवड्यातून पाच दिवस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
Sindhudurg-Pune FLY 91 Flight
Sindhudurg-Pune FLY 91 FlightDainik Gomantak
Published on
Updated on

सावंतवाडी: प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादाला आणि मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत गोवा आधारित 'फ्लाय ९१' या विमान कंपनीनं सिंधुदुर्ग-चिपी विमानतळ ते पुणे या मार्गावरील विमानसेवा आता आठवड्यातून पाच दिवस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही सेवा फक्त दोन दिवस उपलब्ध होती.

'फ्लाय ९१' या विमान कंपनीच्या या निर्णयामुळं कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवास अधिक सुलभ होणार असून, दोन्ही भागांतील पर्यटन, व्यवसाय, शिक्षण आणि सामाजिक संबंध यांना मोठी चालना मिळेल. गोवा आणि कोकणाला जोडणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळामुळे प्रवाशांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचत असून, पर्यटनासाठी हे एक महत्त्वाचे केंद्र ठरत आहे.

कोकण किनारपट्टीवर वसलेला एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक सिंधुदुर्ग जिल्हा जो आपल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांमुळे, प्राचीन किल्ल्यांमुळे आणि समृद्ध सांस्कृतिक वारशामुळे पर्यटकांना भुरळ घालत आहे. शासनाच्या विविध पर्यटन प्रकल्पांमुळे स्थानिक रोजगाराला चालना मिळत असून, पर्यटन उद्योगामध्ये मोठी वाढ होत आहे.

Sindhudurg-Pune FLY 91 Flight
Unseasonal Rain Goa: गोव्यात अवकाळी पावसाचा कहर! राजधानी पणजीसह अनेक भागांत मुसळधार सरी

या संदर्भात बोलताना 'फ्लाय९१'चे सीइओ मनोज चाको म्हणाले, प्रादेशिक कनेक्टिविटी मजबूत करणे हे 'फ्लाय९१'चे ध्येय आहे. विमानसेवा आता आठवड्यातून पाच दिवस सुरु करण्याच्या निर्णयामुळे अधिक प्रवाशांना सिंधुदुर्ग फिरण्यास प्रोत्साहन मिळेल आणि स्थानिक व्यवसायांना देखील मदत होईल.

फ्लाय९१ने सुरुवातीपासूनच कमी वेळ, किफायतशीर तिकीटदर आणि प्रभावी सेवा यांच्या जोरावर प्रवाशांचं लक्ष वेधलं आहे. सिंधुदुर्ग-पुणे या मार्गावरील उड्डाणे वाढवल्यामुळे कोकणातील प्रवाशांसाठी एक मोठी सोय निर्माण होणार असून, त्याचबरोबर पुणे शहरातील व्यावसायिक व शैक्षणिक प्रवाशांसाठीही ही सेवा फायदेशीर ठरणार आहे.

Sindhudurg-Pune FLY 91 Flight
Goa School Reopening: राज्यात शैक्षणिक वर्षाला विद्यार्थ्यांचा पूर्ण प्रतिसाद; पालकांचा विरोध कायम

कोकण-गोव्याच्या पर्यटनाला मिळणार गती

'फ्लाय९१' कंपनीच्या विमानसेवेमुळं कोकणातील समुद्रकिनारे, नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक स्थळं तसंच गोव्याच्या जलक्रीडा, नाईटलाईफ आणि संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेलाही याचा थेट लाभ होईल, कारण हॉटेल व्यवसाय, स्थानिक मार्गदर्शक, टॅक्सी सेवा व इतर पर्यटनाशी संबंधित व्यवसायांना चालना मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com