धारबांदोडा (GOA)_: आमदार सुदिन (SUDIN )ढवळीकर (Dhavalikar) यांनी धारबांदोडा तालुक्यातील पूरग्रस्त (Flooded) भागात बुधवारी भेट देऊन पाहणी केली. ढवळीकर ट्रस्टतर्फे (Dhavalikar Trust) पूरग्रस्त कुटुंबांना शक्यतो मदत दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. धारबांदोडा पंचायतीचे पंच सदस्य विनायक गावस व परेश खुटकर उपस्थित होते. वासिमरड शिगाव येथील कुमार मोहिते यांच्या पुरामुळे कोसळलेल्या घराची पाहणी त्यांनी केली. ते म्हणाले, सरकारने अजूनपर्यंत पूरग्रस्तांना कोणतीच मदत केलेली नाही. जी मदत पूरग्रस्तांना द्यायची आहे, ती सरकारने तत्काळ द्यावी. पूरग्रस्तांची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे. बागायतीची तर मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. अशा वेळी सरकारने जर योग्य प्रमाणात आर्थिक मदत केली नाही, तर भविष्यात लोक शेती व्यवसायाकडे वळणार नाही. त्यामुळे शेती हा देशाचा आर्थिक कणा असे मानले जात आहे, ते केवळ नावापुरतेच राहणार असल्याचे ते म्हणाले.
दावकोण या गावाला गेल्यावर्षी पूर आला होता व चार घरांना नुकसान झाले होते. त्या घरांना अजूनपर्यंत आर्थिक मदत मिळालेली नाही, असे त्या कुटुंबाकडून आपल्याला कळले. त्यामुळे गरिबांना वाली कोणी राहिलेला नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रचार दौरे न करता या पूरग्रस्त कुटुंबाची चौकशी करावी. शिक्षणक्षेत्राचा जो बट्ट्याबोळ झाला आहे, त्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करून ढवळीकर ट्रस्टतर्फे पूरग्रस्तांना शक्यतो, मदत दिली जाईल, असे ते म्हणाले. सावर्डे मतदारसंघात मगोचा उमेदवार निश्चित झाला का? असा प्रश्न त्यांना केल्यानंतर ते म्हणाले, सध्या तीन उमेदवार इच्छूक आहेत, त्यापैकी एकाचे नाव पक्षाच्या समितीतर्फे निश्चित करण्यात येणार असल्याचे सांगितले. विनायक गावस यांनी ढवळीकर यांनी पूरग्रस्त भागात भेट देऊन पाहणी केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.