IndiGo Flight Emergency Landing: प्रवाशासोबत अचानक असं काही घडलं की पाकिस्तानला केलं इमर्जन्सी लँडींग, पण त्याआधीच...

प्रवाशाची अचानक तब्येत बिघडल्याने दोहा-जाणारं विमान कराचीला वळवण्यात आले होते पण...
Indigo Flight
Indigo FlightDainik Gomantak

 इंडिगो कंपनीच्या  दोहाला जाणाऱ्या विमानाचे कराचीमध्ये इमर्जंन्सी लँडिग (Emergency Landing) करण्यात आले होते. विमानातील एका प्रवाशाची तब्येत अचानक बिघडल्याने दोहाला जाणारं हे विमान कराचीला वळवण्यात आले.

पण लॅडिंगपुर्वीच प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, एअरलाईन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, इमर्जंन्सी लँडिगनंतर मेडिकल टीमने प्रवाशाची तपासणी केली असता, त्याला मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रवासी नायजेरियाचा नागरिक असल्याची माहिती समोर येत आहे.  

एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. यानुसार, वैद्यकीय आणीबाणीमुळे पाकिस्तानमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिग करण्यात आले.

दोहाला जाणारे इंडिगोचे विमान कराचीला वळवण्यात आले होते. दिल्लीहून दोहाला जाणारी इंडिगो फ्लाईट 6E-1736 वैद्यकीय आणीबाणीमुळे कराचीला वळवण्यात आले. दुर्दैवाने विमानाच्या लँडिंगनंतर विमानतळावरील वैद्यकीय पथकाने प्रवाशाला मृत घोषित केले, असं एअरलाइन्सने माहिती दिली आहे.

  • विमानातील प्रवाशाचा मृत्यू

इंडिगो कंपनीने याबाबत निवेदन जारी करत म्हटलं आहे की, नवी दिल्लीहून दोहाला जाणारं इंडिगो एअरलाईन्सचे विमान 6E-1736 हे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे पाकिस्तानातील कराची शहरात वळवण्यात आलं. प्रवाशाची तब्येत बिघडल्याने विमान कराचीला वळवल इमर्जंन्सी लँडिग करण्यात आलं. दरम्यान, फ्लाईट लँड होताच विमानतळाच्या वैद्यकीय पथकाने आजारी प्रवाशाची तपासणी करत प्रवाशाचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं.

कंपनीने प्रवाशाचा कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. "आम्ही या बातमीने खूप दुःखी झालो आहोत आणि आमच्या संवेदना त्याच्या कुटुंबीयांसह आणि प्रियजनांसोबत आहेत. आम्ही सध्या संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहोत आणि फ्लाईटमधील इतर प्रवाशांच्या प्रवासाची व्यवस्था करत आहोत," असे इंडिगोनं निवेदनात म्हटलं आहे.

  • मृत प्रवासी नायजेरियन नागरिक

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशाची अचानक तब्येत बिघडल्याने प्रवाशाला वाचवण्यासाठी हे लँडिंग करण्यात आलं. कराचीमध्ये इमर्जन्सी लँडिंग केल्यानंतर विमानतळावरील वैद्यकीय पथकाने प्रवाशाला मृत घोषित केलं. त्यानंतर इंडिगो फ्लाईटने मृत प्रवाशासह दिल्लीला परत उड्डाण केलं. हा प्रवासी नायजेरियन नागरिक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com