या गोमंतकीयांना कोणी घर देता का घर...

घर सावरण्यासाठी आर्थिक मदत मात्र अवघ्याच लोकांनी दिली. सरकारची मदतही या लोकांना अपेक्षित आहे, पण अजून मिळालेली नाही.
या गोमंतकीयांना कोणी घर देता का घर...
या गोमंतकीयांना कोणी घर देता का घर...Dainik Gomantak
Published on
Updated on

पंधरवड्यापूर्वीच्या महापुरामुळे (Floods) अनेक भागांना मोठा फटका बसला. लोकांची घरे (House) कोसळली, अनेकजण बेघर झाले. आता या आपत्तीत अनेकांनी या लोकांना मदतही (Help) केली. पण घर सावरण्यासाठी आर्थिक मदत मात्र अवघ्याच लोकांनी दिली. सरकारची (Goa Government) मदतही या लोकांना अपेक्षित आहे, पण अजून मिळालेली नाही. मात्र, निवडणूक (Election) समोर ठेवून बऱ्याच समाजसेवकांनी कडधान्याच्या पोटल्या मात्र या आपदग्रस्तांना (Disaster stricken) वाटल्या. आता घरच नाही तर हे धान्य कुठे ठेवायचे, हा प्रश्‍न आपदग्रस्तांसमोर आहे. त्यामुळे काही धान्य कुजूनही गेले आहे. शेवटी शेवटी तर आता या पोटल्या थांबवा आणि घर उभारणीसाठी थेट मदत करा, असे म्हणण्याची वेळ या आपदग्रस्तांवर आली आहे. निवडणुकीसाठी कोण कसा फायदा घेईल हे सांगता येत नाही. (Flood Impact: Goa government did not reach out to people Disaster stricken)

सत्तरीत 23 जुलैला म्हादई नदीला (Mandovi River) महापूर (Floods) येऊन त्याचा फटका किनारी भागाला बसला. त्यातून घरातील वस्तू - उपकरणे वाहून जाणे, खराब होणे असे प्रकार घडले. शेती-बागायतींचे प्रचंड नुकसान झाली. तसेच अनेक भागांतील हातावर पोट असलेली गरीब कुटुंबे यात बेघर झाली. हा पूर त्यांचे छत हिरावणारा, त्यांना आर्थिक संकटात नेणारा ठरला.

या गोमंतकीयांना कोणी घर देता का घर...
या गोमंतकीयांना कोणी घर देता का घर...Dainik Gomantak
या गोमंतकीयांना कोणी घर देता का घर...
Goa Floods Impact: पुरामुळे उजळणार बोणकेवाडाचे भाग्य?

म्हादई नदी किनारी असलेल्या सोनाळ ते उसगाव खांडेपारपर्यंतच्‍या भागाला या पुराचा सर्वाधिक फटका बसला. त्यात किनारी भागातील अनेक घरे जमीनदोस्त झाली. पुरात जमीनदोस्त झालेली बहुतेक सर्व घरे ही मातीची घरे होती. यातील अनेक घरांमध्‍ये अत्‍यंत गरीब कुटुंबे राहायची. त्‍यांची घरे पुरात उद्‍ध्‍वस्‍त झाल्‍याने ती बेघर झाली आहेत.

म्हादई खोऱ्यात ‘एवढा पूर आला, आमचे सर्वस्व गेले, काही तुटपुंजी रक्कम सरकार आता आमच्या तोंडावर फेकून औदार्याचा मोठा आव आणणार आहे, परंतु पुराचा (Floods) प्रश्न समजून घेण्याची कुवत आमच्या नेत्यांमध्ये आहे काय? अधिकाऱ्यांकडे तेवढे कौशल्य आहे काय?’ असे प्रश्न पुढे आलेत. म्हादईच्या खोऱ्याला या महापुराने जबरदस्त तडाखा दिला. त्यातून अद्याप तो सावरलेला नाही.

या गोमंतकीयांना कोणी घर देता का घर...
Goa Flood: मागच्या पुरात कोसळलेली घरं अजूनही उभी राहीली नाहीत
या गोमंतकीयांना कोणी घर देता का घर...
या गोमंतकीयांना कोणी घर देता का घर...Dainik Gomantak

महापुराने सत्तरीतील अनेक भाग भूईसपाट झाल्याचे, त्यांच्या बागायती उद्‍ध्वस्त झाल्याने आणि हताश, उदासवाणे भयावह चित्र प्रत्यक्ष दिसत होते. म्हादई नदीच्या नाल्याचे पाणी सहा फूट चढले आणि ते पुलावरून वाहात अडवई गावातील भटवाडीच्या घरांच्या छपरावरून वाहू लागले. घरे कोसळली. तेथे गुडघाभर चिखल निर्माण झाला होता. त्यात उभे राहून 86 वर्षांचे विष्णू पद्माकर सावईकर यांच्या डोळ्यात दु:खाश्रु असतांनाच अनेक प्रश्न सुद्धा उभे होते. तेव्हा या प्रश्नांची दखल सरकार घेणार का? विस्कटलेल्या घरांची घडी पुन्हा बसणार का? की गोमंतकीयांना 'कोणी घर देता का घर' अशी म्हणायाची वेळ येणार?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com