
फोंडा: कुरतरकर नगरी शांतीनगर फोंडा येथे एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅटला रात्री साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागल्याने फ्लॅटमधील चीजवस्तू जळून खाक झाल्या. या आगीत दहा लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू जळाल्या.
बेडरूममधील एसीला प्रथम आग लागली आणि त्यानंतर ती फ्लॅटभर पसरली मात्र वेळीच रात्रीच्या वेळेला आपल्या बाल्कनीत आलेल्या समोरील फ्लॅटमधील रहिवाशाला धूर आणि आग दिसल्याने त्याने त्वरित अग्निशामक दलाला कळवले त्यामुळे इतर फ्लॅटधारकाचे नुकसान झाले नाही. रात्री अचानक या फ्लॅटच्या रस्त्याकडेला असलेल्या खिडकीतून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा पाहून समोरील फ्लॅटच्या मालकाने त्वरित फोंडा अग्निशामक दलाला कळवले.
त्यानंतर दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे इमारतीतील इतर फ्लॅट बचावले. बांदोडकर नामक कुटुंबाच्या या फ्लॅटमध्ये आग लागली त्यावेळेला कुणीही नव्हते. आग विझवताना इमारतीतील इतर फ्लॅटमधील सर्व लोकांना इमारतीबाहेर काढून महत्प्रयासाने दलाच्या जवानांनी आग विझवली.
नगरसेवक रूपक देसाई तसेच कुरतरकरनगरी रहिवासी असोसिएशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कविटकर यांनी दलाच्या जवानांना सहकार्य केले. फोंडा अग्निशामक दलाचे अधिकारी सुशील मोरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली दलाच्या जवानांनी आग विझवली.
विजेची समस्या जाणवली होती !
आगीत फ्लॅटच्या बेडरूममधील सर्व वस्तू जळून खाक झाल्या. बेडरूममधून आग हॉल व किचनमध्ये पसरली, त्यामुळे या दोन्ही खोल्यानाही आगीची झळ बसली. उपलब्ध माहितीनुसार या इमारतीत विजेची समस्या संध्याकाळी जाणवली होती, त्यानंतर वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी येऊन दुरुस्तीही केली होती, अशी माहिती स्थानिक नगरसेवक रुपक देसाई यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.