Goa Fire: मालक बाहेर पडला अन् फ्लॅटमधून धूर येऊ लागला; सिलिंडर बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली

Goa Fire Case: फ्लॅटचे दार तोडण्यात आले व जवानांनी पाण्याची फवारणी करून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत फ्लॅटमधील सामान खाक झाले होते.
Goa Fire: मालक बाहेर पडला अन् फ्लॅटमधून धूर येऊ लागला; सिलिंडर बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली
Flat Gutted in Fire At Kujira, BambolimDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Fire Case

पणजी: कुजिरा बांबोळी येथील स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावरील एका बंद फ्लॅटला आग लागून आतील सर्व सामान खाक झाले. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली.

आगीमागील कारण मात्र समजू शकले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणून तेथील दोन गॅस सिलिंडर बाहेर काढण्यास यश मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली.

या आगीत लाखो रुपयांचे सामान खाक झाल्याचा अंदाज जुने गोवे पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून त्यामागील कारण शोधण्यासाठी वीज खात्याला तपासणी करण्यास सांगण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आग लागलेला फ्लॅट हा सुनिता शिरोडकर यांच्या मालकीचा असून त्यांनी तो रवी शंकर नामक व्यक्तीला भाडेपट्टीवर दिला आहे. व्यवसायाने चालक असलेला शंकर हा आज पहाटे ४च्या सुमारास कामानिमित्त फ्लॅट बंद करून निघून गेला.

पहाटे या फ्लॅटमधून धूर येत असल्याचे दिसताच या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला. त्यानुसार पोलिस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. फ्लॅटचे दार तोडण्यात आले व जवानांनी पाण्याची फवारणी करून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत फ्लॅटमधील सामान खाक झाले होते.

यामध्ये रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन तसेच कपडे याचा समावेश होता. स्वयंपाक घरातील स्टील शेगडीही जळाली. तेथील गॅस सिलिंडर या आगीमुळे तापले होते, मात्र त्याचा स्फोट न झाल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना झाली नाही, अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी रुपेश नाईक यांनी दिली.

Goa Fire: मालक बाहेर पडला अन् फ्लॅटमधून धूर येऊ लागला; सिलिंडर बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली
Goa Narkasur: 15 बॉक्स बिअर आणि चार हजार कॅश! गोव्यात नरकासूर स्पर्धेनिमित्त विचित्र बक्षीस

शॉर्ट सर्कीटची शक्यता...

फ्लॅटचा भाडेकरू रवी शंकर याच्याकडून आगीत नुकसान झालेल्या सामानाची माहिती घेण्यात येत आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आग लागली तेव्हा फ्लॅट बंद होता व कोणीही नव्हते.

शंकर हा एकटाच या फ्लॅटमध्ये राहत होता. त्याची जबानी नोंदवून घेण्यात आली असून आगीचे नेमके कारण काय याचा शोध घेण्यासाठी वीज खात्याच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे, असे जुने गोवे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com