Lok Sabha Elections 2024 : दोन्ही मतदारसंघांत चुरस

भाजपकडून नव्या उमेदवारांसाठी चाचपणी सुरू
OBC Bill: 127th Amendment Bill passed in Lok Sabha
OBC Bill: 127th Amendment Bill passed in Lok SabhaDainik Gomantak
Published on
Updated on

Lok Sabha Elections 2024 : लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम देशभर वाजण्यास सुरुवात झाली असतानाच गोव्यातील दोन्ही मतदारसंघांत नवे उमेदवार देण्यासाठी भाजपने चाचपणी सुरू केली आहे. कॉंग्रेसच्या गोटात मात्र अजूनही सामसूम आहे.

शुक्रवारी डिचोली येथे माजी जिल्हा पंचायत सदस्य संजय शेट्ये यांना भाजप प्रवेश देण्यासाठी घेतलेल्या सभेला दोन हजारांवर लोकांची उपस्थिती असता, तेथे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या अनुपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. या सभेला मंत्री श्रीपाद नाईक यांना आमंत्रण दिले नसल्याची चर्चा आहे.

उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक यांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता पक्षातील धुरीण व्यक्त करू लागले आहेत. ‘2024 च्या या निवडणुकीत उत्तर गोव्यात नवा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघात नाईक यांनाच उमेदवारी मिळेल काय, याबद्दल पक्षातील नेत्यांमध्ये संभ्रम आहे. स्वतः नाईक यांना या उमेदवारीमध्ये रस आहे आणि ते तसे उघडपणे बोलून दाखवितात'', अशी माहिती एका ज्येष्ठ संघटनात्मक नेत्याने या प्रतिनिधीला दिली.

OBC Bill: 127th Amendment Bill passed in Lok Sabha
Dayanand Bandodkar Sports Complex: झेवियर्सचा महाविद्यालयीन हॉकीत दबदबा

उत्तरेकडील जागा भाजप अलीकडच्या काळात स्वबळावर जिंकून आणते. येथील बहुसंख्य विधानसभा मतदारसंघांत पक्षाचे आमदार आपल्या लोकप्रियतेच्या आधारे मताधिक्य मिळवतात.

गेल्या वेळी तर नरेंद्र मोदी यांच्या म्हापशातील सभेमुळे भाजपच्या उमेदवाराला दहा हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले होते, अशी माहिती या पक्षाचे नेते देतात.

डिचोली येथे आता पक्षाने पूर्ण प्राबल्य निर्माण केले आहे. शेट्ये बंधूंच्या भाजप प्रवेशानंतर तेथे पक्ष पूर्ण ताकदीने उभा राहील, याची शाश्‍वती नेते मंडळी देतात. लक्षात घेतले पाहिजे की, गेल्या विधानसभा निवडणुकीत तेथे भाजप उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला होता.

आता एका वर्षावर आलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला डिचोलीत दहा ते बारा हजारांचे मताधिक्य मिळवून देण्याचा विश्‍वास शुक्रवारच्या सभेनंतर नेत्यांनी दिला.

गेल्या काही वर्षांत भाजपकडून लोकसभेसाठी वर्षभर आधीच उमेदवार निश्‍चित होत असे. २०१४ मध्ये तर मनोहर पर्रीकर यांनी ॲड. नरेंद्र सावईकरांना वर्षभर आधीच कामाला लागण्याचा आदेश दिला होता.

परंतु तसे कोणतेही संकेत यावेळी उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे पक्षश्रेष्ठी वेगळा विचार करीत असावेत, अशी संभावना पक्षात निर्माण झाली आहे.

दक्षिण गोव्यात कॉंग्रेसमध्ये निरुत्साह

दक्षिणेत दिगंबर कामत यांना उमेदवारी मिळाल्यास आपला निभाव लागणार नाही, याची जाणीव स्वतः फ्रान्सिस सार्दिन यांना आहे. दुसऱ्या बाजूला उत्तरेकडे भाजपची पताका उंच फडकू लागल्याने काँग्रेस नेत्यांमध्येही उमेदवारीबद्दल फारशी उत्सुकता राहिलेली नाही.

भाजप आपल्या उमेदवारांबाबत अनभिज्ञ असतानाच काँग्रेसमध्ये तर संपूर्णतः काळोख आहे. फ्रान्सिस सार्दिन यांना नव्याने उमेदवारी मिळणार नाही. या मतदारसंघात काँग्रेसची कामगिरीही फारशी समाधानकारक नाही.

OBC Bill: 127th Amendment Bill passed in Lok Sabha
Dona Paula Jetty: प्रतीक्षा संपली! अखेर 4 वर्षांनंतर डोना पावला जेटी खुली, पर्यटकांना मोजावे लागणार शुल्क

उत्तर गोव्यात भाजपचे वर्चस्व अबाधित

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनीही वाळपई व पर्ये या दोन्ही विधानसभा मतदारसंघांतून २२ हजारांचे मताधिक्य लोकसभेला मिळवून देऊ, असे वचन दिले आहे. त्यामुळे पक्षाने कोणताही उमेदवार दिला तरी त्याचा विजय कोणी रोखू शकणार नाही, अशी चर्चा भाजप नेत्यांमध्ये सुरू झाली असून, नुकत्याच मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत तसे मत व्यक्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यसभेसाठी तानावडेंची चर्चा

दक्षिण गोव्यातही भाजपची उमेदवारी कोणाला मिळेल, हे गूढ आहे. यावेळी दिगंबर कामत, विनय तेंडुलकर, नरेंद्र सावईकर, दामू नाईक आणि बाबू कवळेकर ही मंडळी स्पर्धेत आहेत.

राज्यसभेची उमेदवारी यावेळी विनय तेंडुलकर यांना मिळणार नसल्याचे जवळ-जवळ निश्‍चित झाले आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या नावाचा त्यासाठी विचार सुरू आहे. त्यामुळे तेंडुलकर दक्षिण गोव्याच्या लोकसभा उमेदवारीसाठी उत्सुक आहेत.

मोदी करिश्‍मा कायम

विरोधी पक्षांत ऐक्याची भावना रुजू लागली आहे. त्यातून काँग्रेसला उभारी मिळाली तर काँग्रेस समान उमेदवार देऊ शकेल. परंतु नरेंद्र मोदी यांचा करिश्‍मा यावेळीही कायम असल्याचे राजकीय निरीक्षक मानतात. मोदी लोकप्रियतेची लाट हिंदू मतदारांनी उचलून धरल्यास उत्तरेप्रमाणे दक्षिणेतही गढ सर करणे भाजपला शक्य होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com