Panjim Fish Market: पणजी मासळी मार्केटमधील मासळी विक्रेत्यांना मासळी पुरवठ्यासाठी पुढील दोन दिवस साठवलेल्या मासळीवर अवलंबून राहावे लागणार असल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच पडलेल्या मुसळधार पावसामुळे मासेमारी करणारे ट्रॉलर्स नांगरून राहिले आहेत. यामुळे मासे विक्रेत्यांना साठवलेल्या मासळीशिवाय पर्याय नाही.
पणजीतील मत्स्यप्रेमींना पुढील दोन ते तीन दिवस ताजे मासे मिळण्याची शक्यता कमीच आहे. याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून खराब हवामानामुळे मासेमारी करणाऱ्या ट्रॉलर्सनी मांडवी नदीत नांगर टाकला आहे.
मासळी विक्रेत्यांकडे साठवलेली मासळी केवळ दोन दिवसच पुरण्याची शक्यता आहे.
पणजी मासळी मार्केटमधील एका मासळी विक्रेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, विक्रेत्यांकडे पुरेसा मासळीचा साठा असून पुढील दोन दिवस मासळीचा साठा पुरू शकतो.
मासळी पुरवठा करताना मासळी विक्रेत्यांना तशी अडचण येणार नाही, कारण गरज भासल्यास मडगाव घाऊक मासळी बाजारातून मासळी खरेदी केली जाईल.
माडगावमधील मासळीचा साठा संपला तर मग काय कराल, असे विचारले असता, मासळी विक्रेत्याने ही परिस्थिती उद्भवल्यास आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आदी भागातून येणारी मासळी विक्रेते खरेदी करतील, असा खुलासा केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.