Goa Fishing: गोव्यात आजपासून मासेमारीस प्रारंभ, ‘कुटबण जेटी’ सज्ज; बोटमालकांना कामगार परतण्याची प्रतीक्षा
Goa FishingDainik Gomantak

Goa Fishing: गोव्यात आजपासून मासेमारीस प्रारंभ, ‘कुटबण जेटी’ सज्ज; बोटमालकांना कामगार परतण्याची प्रतीक्षा

Goa Fishing: कुटबण ही गोव्यातील एक प्रसिद्ध जेटी असून मासेमारीसाठी बोटी इथूनच समुद्रात रवाना होतात.
Published on

राज्यात १ जूनपासून बंद असलेली मासेमारी आजपासून (१ ऑगस्ट) सुरू होत आहे. कुटबण ही गोव्यातील एक प्रसिद्ध जेटी असून मासेमारीसाठी बोटी इथूनच समुद्रात रवाना होतात. त्यामुळे नव्या हंगामातील मासेमारीसाठी कुटबण जेटी सज्ज झाली आहे.

जे परप्रांतिय मजुर आपल्या गावी गेले होते ते परतू लागले आहेत. या जेटीवर आंध्र, बिहार, यूपी, ओडीशा, झारखंड, कर्नाटक या राज्यातील अंदाजे ५ हजार तरी मजूर काम करतात. पण सध्या यातील अर्ध्यांहून कमी मजूर कामावर परतले आहेत. उर्वरित हळू हळू येतील, असे बोट मालकांचे म्हणणे आहे.

Goa Fishing: गोव्यात आजपासून मासेमारीस प्रारंभ, ‘कुटबण जेटी’ सज्ज; बोटमालकांना कामगार परतण्याची प्रतीक्षा
Goa Fishing: 2023-24 मध्ये सागरी, नदीतील मासेमारीचा आकडा किती? मत्स्यव्यवसाय विभागाने सादर केले Statistics

काही कामगारांनी आपल्या बोटीची तपासणी, जाळी विणणे, ती व्यवस्थित ठेवणे, ही जाळी तसेच इतर साधन सामुग्री बोटी मध्ये चढवणे सारखी कामे सुरू केली आहेत. तसेच या जेटीवर बर्फ तयार करण्याची जी लहान मोठी व्यवस्था आहे,तीही कार्यरत झाली आहे. काही जणांनी बोटीची दुरुस्ती तसेच सुतार कामही काही दिवसांपूर्वीच सुरू केले होते.

Goa Fishing: गोव्यात आजपासून मासेमारीस प्रारंभ, ‘कुटबण जेटी’ सज्ज; बोटमालकांना कामगार परतण्याची प्रतीक्षा
Goa Fish Market: दुरुस्तीच्या प्रतीक्षेत बायणा मासळी मार्केट; मुरगाव पालिकेचे दुर्लक्ष

खात्याचे जेटीकडे दुर्लक्ष !

दरम्यान, बोट मालकांनी येथील जेटीवरील व्यवस्थापन नियंत्रित पाहिजे, असे राज्य सरकारच्या लक्षात आणून दिले आहे. या जेटीचा ताबा मत्स्योद्योग खात्याने घेतला आहे. मात्र खात्याकडून आवश्यक सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या अनेक तक्रारी केल्या आहेत. जेटीवर सीसीटीव्ही कॅमेरे, रस्त्यावरील पथदीप, जलवाहिनी, देखरेख व स्वच्छतेसाठी खात्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचेही महासंघाचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com