Nilkanth Halarnkar on Fisheries: ...तर खाण उद्योगाप्रमाणे 'या' क्षेत्रात होऊ शकते गोव्याची भरभराट

राज्यातील युवकांनी या क्षेत्राकडे सकारात्मकपणे पाहणे गरजेचे
Goa News | Fishing
Goa News | FishingDainik Gomantak

गोव्यातील तरुण पिढीने मासे क्षेत्राची करियर म्हणून निवड करत नवी कौशल्ये आत्मसात केल्यास मासेमारी उद्योग राज्याची अर्थव्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत करु शकतो असा विश्वास मच्छीमारमंत्री निळकंठ हळर्णकर यांनी व्यक्त केला.

(Fisheries minister Nilkanth Halarnkar Said Goan economy can be majorly dependent on fishing)

पणजी येथे मच्छीमारमंत्री निळकंठ हळर्णकर यांनी आज एका कार्यक्रम प्रसंगी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मंत्री हळर्णकर यांनी गोवा राज्यासाठी मासेमारी व्यवसायाचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले की, गोवा राज्यातील युवकांनी या क्षेत्राकडे सकारात्मकपणे पाहात मासेमारीची कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. यामुळे युवकांसह राज्याची अर्थव्यवस्थेला बळकटी मिळू शकते. मात्र युवकांनी या क्षेत्रात अभिरुची दाखवणे गरजेचे असल्याचं ते म्हणाले.

Goa News | Fishing
Revolutionary Goans Ultimatum : वीरेश बोरकरांचा उपोषणाचा इशारा; आरजीची नेमकी मागणी काय?

मंत्री हळर्णकर पुढे बोलताना म्हणाले की, गोवा राज्याच्या अर्थव्यस्थेचा कणा म्हणून सध्या खाण उद्योगाकडे पाहीले जाते. खाण उद्योग राज्याच्या तिजोरीत ज्याप्रमाणे भर घालतो आहे. त्याप्रमाणे भविष्यात गोव्यातील मासेमारी क्षेत्र ही अनेक कष्टकऱ्यांचे संसार उभा करु शकतो तसेच राज्याच्या तिजोरीत ही मोठी भर टाकू शकते असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Goa News | Fishing
Pramod Sawant Dialogue At Iffi: ठाकूर यांचा आग्रह मुख्यमंत्री सावंतांचा फिल्मी डायलॉग, मग टाळ्या अन् शिट्या...

....याची मोठी किंमत राज्याला मोजावी लागू शकते

मासेमारीला ओरबाडणारे उद्योग चालू ठेवल्यास याची मोठी किंमत राज्याला मोजावी लागू शकते. त्यामुळे मासेमारीसाठीचे अवैध प्रकार वेळीच थांबवले गेले. व अधिक उत्पादन वाढवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची जोड दिल्यास याचा फायदा नक्की होऊ शकतो असे ही ते म्हणाले.

यावेळी मंत्री हळर्णकर यांनी आवाहन केले की, या क्षेत्रात उच्च शिक्षित तरुणांनी आपले कौशल्य पणाला लावत या क्षेत्रात यावे. यामुळे गोवा राज्याला मासेमारी क्षेत्रात चांगले दिवस येऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com