नागाळीत डोंगरकापणीमुळे लोकं भीतीच्या छायेखाली

ताळगावच्या रहिवासी व ‘आप’च्या संयोजिका सिसिल रॉड्रिग्स यांनी या प्रकरणात राजकीय धेंडांचा हात असल्याचा आरोप केला आहे.
Trees are being cut down on private land of politician in goa
Trees are being cut down on private land of politician in goa Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ताळगाव-नागाळी येथील ‘गार्बेज डंप’ जवळ असलेल्या एका वजनदार राजकीय व्यक्तीच्या खासगी जागेवर मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात आहे. कायदा धाब्यावर बसवून चालू असलेल्या या डोंगर कापणीकडे मात्र सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. नागाळी येथे असंख्य झाडे कापून कच्चा रस्ता बनवण्यात येत आहे. या भागात स्थनिकांची घरे असून, डोंगर कापणीमुळे दरडी कोसळून त्यांच्या घरांना धोका निर्माण झालेला आहे. स्थानिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातारण आहे. याबाबत उघडपणे बोलायला लोक घाबरत आहेत. नेमका हा रस्ता कुणासाठी बांधण्याचा घाट बांधला जात आहे, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Trees are being cut down on private land of politician in goa
Goa: आम्ही पेडणेकर स्थानिक आमदारालाच निवडून आणू

यासंदर्भात, ताळगावचे सरपंच आग्नेल डिकुन्हा यांच्याशी संपर्क साधला असता आपण या प्रकाराविषयी काहीच माहिती नसल्याचे ते म्हणाले. आपल्यापर्यंत नागाळी येथील डोंगरकापणीची किंवा झाडे कापण्याची कोणतीही तक्रार अद्याप आली नसून ती आल्यास पुढे काय करायचे ते बघू असे उत्तर त्यांनी दिले. ताळगावच्या रहिवासी व ‘आप’च्या संयोजिका सिसिल रॉड्रिग्स यांनी या प्रकरणात राजकीय धेंडांचा हात असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, जंगलतोड करीत असलेली व्यक्ती स्थानिक आमदार व एका मंत्र्यांची निकटवर्तीय असून त्यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. मंत्र्यांच्या आशीर्वादानेच हे काम चाललेले असून ताळगावमधील अनेक जमिनी त्यांनी बळकावलेल्या आहेत. परंतु संपूर्ण गावात त्या व्यक्तीची जरब असल्याने स्थानिक तिच्याविरुद्ध बोलण्यास धजावत नाहीत, असे त्या म्हणाल्या.

Trees are being cut down on private land of politician in goa
Goa Politics: काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीची बोलणी कोलमडली

बंगल्यासाठी असावा घाट

हा रस्ता नेमका कुणासाठी बांधला जात आहे, याबाबत माहिती मिळू शकली नसली तरी स्थानिक लोकांनी हा रस्ता एका वजनदार व्यक्तीच्या बंगल्यासाठी बांधला जात असल्याच्या संशय व्यक्त केला आहे. एक महिला म्हणाली, ही डोंगर कापणी आमच्या घरांसाठी धोकादायक ठरू शकते. याबाबत कुणीही काहीच बोलत नाही. बरेच लोक भीतीच्या छायेखाली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com