गोव्यासारखी बोट पार्टी आता राजस्थानातही, लवकरच धावणार पहिली सौर उर्जेवर चालणारी क्रूझ

विशेष म्हणजे गोव्याच्या बोट क्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ही क्रूझ बनवली आहे.
First Solar Cruise In Rajasthan
First Solar Cruise In Rajasthan
Published on
Updated on

First Solar Cruise In Rajasthan

देशातील पहिली सौर उर्जेवर चालणारी क्रूझ राजस्थानमध्ये धावणार आहे. क्रूझ जवळपास तयार होत आली असून ऑगस्टपर्यंत ती सर्वांसाठी खुली होईल. अजमेरच्या अनासागर तलावात ही क्रूझ धावेल. क्रूझच्या रुफटॉप आणि इंजिनचे काम अद्याप बाकी आहे.

विशेष म्हणजे गोव्याच्या बोट क्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ही क्रूझ बनवली आहे. यात तुम्ही पार्टी करण्यासह स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेता येईल.

डबल डेकर असणाऱ्या ही क्रूझ 8×22 मीटरमध्ये तयार करण्यात आली आहे. गोव्याच्या कंपनीकडून ही क्रूझ बनवण्यासाठी थीमपासून ते लोकांच्या अवडी निवडीची बरीच काळजी घेण्यात आली आहे. वाढदिवस किंवा डीजे पार्टीसाठी क्रूझ बुक करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. एका दिवसात 1 ते 3 तास किंवा त्याहून अधिक वेळ बुक करू शकता.

राजस्थानची बनी-थानी, केशरिया बालम यासारख्या थीम विचारात घेऊन क्रूझचे इंटेरिअर तयार करण्यात आले आहे. यामध्ये फास्ट फूडपासून ते राजस्थानी खाद्यपदार्थ आणि इतर प्रकारचे खाद्यपदार्थही उपलब्ध असतील.

क्रूझवरील एका फेरीसाठी किती शुल्क आकारले जाणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. क्रूझसाठी 5 कोटी रुपये खर्च होणारयेत. डबल डेकर इलेक्ट्रिक क्रूझ सौरऊर्जेवर चालणार आहे.

First Solar Cruise In Rajasthan
Goa Burglary Case: गोव्यासह तीन राज्यांमध्ये घरफोड्या, 30 लाखांच्या मुद्देमालासहित चोरटा जेरबंद

कंपनी सुमारे 1 वर्षापासून क्रूझची बांधणी करत आहेत. क्रूझ सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत चालेल. यामध्ये 150 लोकांसह क्रू मेंबर्स, स्वयंपाकी आणि कॅप्टन आणि इतर कर्मचारी उपस्थित राहतील. क्रूझमध्ये 16 सीसीटीव्ही आणि 200 लाइव्ह जॅकेट आहेत. सुरक्षेचा विचार करून रेस्क्यू बोटही क्रूझच्या मागे धावतील.

सौरऊर्जेवर चालणारी ही देशातील पहिली क्रूझ आहे. मात्र, गरज पडल्यास यात जनरेटरचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

यात बनवलेल्या स्वच्छतागृहाचे पाणी तलावात जाणार नाही, यासाठी विशेष टाक्या करण्यात आल्या आहेत. जेटीवर तयार करण्यात आलेल्या सेप्टिक टँकमध्ये या टाक्या रिकाम्या करण्यात येतील. अनासागर तलावाचे सौंदर्य बिघडू नये यासाठी सेप्टिक टँक एसटीपीला जोडण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com