निवडणुकांनंतर तरी तक्रारींची दखल घ्या

तक्रारींची संबंधित खात्याने ताबडतोब दखल घ्यावी म्हणून लोक प्रतीक्षेत आहेत
Demand that government take notice of  complaints of local citizens in goa
Demand that government take notice of complaints of local citizens in goaDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: गोव्यात विधानसभेचे निवडणुकी संदर्भातील मतदान संपले. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार व नवे सरकार सत्तेवर येईल. निवडणुकांपूर्वी लोकांनी आपल्या अनेक तक्रारी वेगवेगळ्या सरकारी खात्यांना सादर केल्या होत्या. (Demand that government take notice of complaints of local citizens in goa)

Demand that government take notice of  complaints of local citizens in goa
गोव्यातील 'त्या' बारा आमदारांना दिलासा

विशेषतः रस्ता, वीज वाहिन्यांची दुरुस्ती, पाणी पुरवठा, नाले दुरुस्ती वगैरे संबंधी या तक्रारी होत्या. पण, आता या तक्रारींची संबंधित खात्याने ताबडतोब दखल घ्यावी म्हणून लोक प्रतीक्षेत आहेत. याचे कारण ज्या लोकांनी तक्रारी केल्या आहेत, ते सध्या धोकादायक व असुरक्षित स्थितीत राहतात.

सार्वजनिक बांधकाम खात्याने दखल घ्यावी, अशी दोन ठिकाणे आहेत. एक बाणावली (Benaulim) व दुसरे मडगावमधील (Margao) जुने रेल्वे स्थानक रस्ता. बाणावली येथील मारीया हॉल जवळ रस्त्याच्या मधोमध चेंबर खुला आहे. त्यामुळे वाहने व पादचाऱ्यांसाठी धोका उद्‍भवू शकतो,अशी स्थिती आहे. तेथील रहिवाशाने सांगितले, की गेले कित्येक दिवस हा चेंबर खुला आहे. उपसरपंच नीलेश प्रभुदेसाई यांनी सांगितले की, पंचायत व बांधकाम खात्याला यासंबंधी कळवणार आहे.

आवाजामुळे लोकांची झोपमोड

बोरकर इस्पितळासमोरील रस्त्यावरच्या चरीतून वा खड्ड्यातून वाहने गेल्याने मोठा आवाज होतो. रात्रीच्या वेळी तर परीसरातील लोकांची या आवाजाने झोपमोड होते. शिवाय त्यात दुचाकीस्वारांना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक नगरसेवकांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी रहिवाशांतून होत आहे.

रस्त्यावर भेगा ठरताहेत धोक्याच्या

मडगाव (Margao) मधील आबाद फारीया रस्ता हा राष्ट्रीय हमरस्ता असून या रस्त्यावरून अहोरात्र हजारो वाहनांची वर्दळ असते. मात्र, गोमन्त विद्या निकेतन इमारतीपासून साधारण २० ते २५ मीटर अंतरावर रस्त्याच्या मधोमध भेगा पडल्या आहेत. पावसाळ्यात या भेगा रुंदावल्या आहेत. तशीच स्थिती याच रस्त्यावर पुढे बोरकर हॉस्पिटल समोरही आहे.

रेलिंग धोकादायक

मडगाव येथील जुन्या रेल्वे स्थानक (Railway Station) रस्त्यावर मधोमध नाला बंद करण्यासाठी जे लोखंडी रेलींग टाकले होते, त्यातील लोखंडी सळ्या काँक्रिटमधून सुटल्या आहेत.त्यामुळे या सळ्यांचा दुचाकीस्वारांसाठी धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. परिसरातील रहिवाशांनी आणि दुकानदारांनी हे रेलिंग अपघात (Accident) घडण्यापूर्वी तातडीने दुरुस्त करावे,अशी मागणी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com