विनोद मेथर जळीतकांड: खरा ‘मास्टर माईंड’ मोकाटच!

विनोद मेथर हत्‍याप्रकरणी ‘लहान मासे’च सापडले पोलिसांच्‍या जाळ्‍यात
विनोद मेथर जळीतकांड
विनोद मेथर जळीतकांडDainik Gomantak
Published on
Updated on

पर्वरी: संपूर्ण गोव्याला (Goa) हादरवून सोडणारे आणि मानव जातीला काळीमा फासणारे पर्वरीतील विनोद मेथर (Vinod Mather) जळीत हत्‍याकांड (Murder Case) प्रकरण आठवले की अजूनही गोमंतकीयांच्‍या अंगावर काटा उभा राहतो. या प्रकरणात गुंतलेल्‍या सहाही संशयित आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असले तरी अजूनही मोठे मासे जाळ्‍यात सापडायचे आहेत. (first dangerous case of arson in history of Goa)

हे संशयित मोकाट फिरत आहेत. त्यांना पकडणे हेच आता पोलिसांसमोर मोठे आव्‍हान आहे. त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणातील ‘मास्टर माईंड’ला लवकरच गजाआड केले जाईल, असे स्‍पष्‍ट केले होते. मात्र या प्रकरणाची एकंदरीत गंभीरता पाहता ते खूपच आव्‍हानात्‍मक आणि गुतागुंतीचे बनले आहे.

विनोद मेथर जळीतकांड
Goa Police: नाट्यमय गुन्ह्याचा पोलिसांकडून पर्दाफाश

गोव्‍याच्‍या इतिहासातील बहुधा हे पहिलेचे जळीत हत्‍याकांड प्रकरण असावे. या हत्याकांडामुळे गोवा पुरता हादरला होता. एखाद्या माणसाला भरदिवसा पेट्रोलजन्य द्रव्य अंगावर टाकून जिवंत जाळण्याची घटना गोव्याने यापूर्वी कधी अनुभवली नव्हती. या घटनेचे पडसाद राज्‍याच्‍या कानाकोपऱ्यांत उमटले होते. जो तो संताप व्‍यक्त करत होता. पोलिसांनी कोणत्याच राजकीय दबावाला बळी न पडता गुन्हेगाराला पकडून कठोर शिक्षा द्यावी अशी लोकांची मागणी होती. उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांनी तत्‍काळ वेगवेगळ्या पोलिस तुकड्या करून या प्रकरणात गुंतलेल्या सहाही संशयित आरोपींना अटक करण्यात यश मिळविले. तरीसुद्धा अजूनही काही बडे मासे मोकटाच आहेत. ज्या क्रूरतेने हा गुन्हा घडला आहे, ते पाहता पोलिसांच्या जाळ्यात सध्‍या छोटे मासेच सापडलेले आहेत.

विनोद मेथर जळीतकांड
Goa Police: अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

अशा घटनांची भविष्यात पुनरावृत्ती होऊ नये असे जर सरकारला वाटत असेल तर त्यांनी पोलिसांना पूर्ण स्वातंत्र देण्याची गरज आहे. तसेच पोलिसांनीही कोणत्याच आमिषांना बळी न पडता तटस्थ भूमिका घेऊन तपासकार्य करण्याची गरज आहे. अन्यथा लोकांचा पोलिसांवरील उरलेला- सुरलेला विश्वासही उडून जाईल. या भयंकर घटनेविरोधात सामाजिक संस्थांनी, राजकीय पक्षांनी आवाज उठवायला पाहिजे होता. पण तसे काही झाले नाही. काही राजकीय पक्षांनी थोडा फार विरोध केला, पण त्यात म्हणावा तितका जोर दिसला नाही. आणखी थोडे दिवस या प्रकरणाची चर्चा होईल व नंतर लोक विसरूनही जातील. त्यासाठी पोलिस यंत्रणेने जबाबदारीपूर्वक तपास करण्याची गरज आहे. कारण अशा काही घडलेल्या घटना पहिल्या तर गोवा हे राज्‍य बिहार, उत्तर प्रदेश राज्याच्या दिशेने जातेय की काय, असा सवाल उपस्‍थित होतो.

काही अनुत्तरीत असलेले प्रश्‍‍न

विलास मेथर जळीतकांड प्रकरणी दोघा संशयितांना तो पेट्रोलजन्य पदार्थ कोठे सापडला? कोणी दिला? तसेच ते जी महागडी कार घेऊन फिरत होते ती त्यांना कोणी दिली? एवढी महागडी कार घेऊन फिरण्याची त्यांची ऐपत आहे का? त्यांनी हे कृत्य कोणाच्या सांगण्यावरून केले आहे का? या दोघा संशयित तरुणांची यापूर्वी गुन्हेगारीत गुंतलेले आहेत का? याचाही शोध घेणे तितकेच गरजेचे आहे. या प्रश्‍‍नांची ज्‍यावेळी उत्तरे मिळतील, त्‍याचवेळी पोलिसांच्‍या जाळ्‍यात खरे गुन्हेगार सापडतील.

काय घडलं होतं ‘त्‍या’ संध्‍याकाळी?

14 ऑक्‍टोबर 2020 ची ती संध्याकाळ. दोघेजण मोटारसायकलवरून येतात आणि विनोद मेथर याच्या गाडीला पाठीमागून ठोकर देतात. कोणी ठोकर दिली हे पाहण्यासाठी विनोद गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवतो आणि गाडीतून खाली उतरतो. त्यावेळी ते दोन तरुण त्याच्याशी वाद घालतात. त्याचदरम्यान त्यातील एकटा आपल्या जवळील पेट्रोलजन्य द्रव्य विनोदच्या अंगावर फेकतो व आगपेटीच्या साहायाने त्याला पेटवून देतो. विनोद जीवाच्या आकांताने जमिनीवर लोळतो, जवळ असलेल्या पाण्यात उडी टाकतो, पण त्याचा काहीच फायदा होत नाही. जवळजवळ 80 टक्के भाजलेल्या अवस्थेत त्याला गोवा वैद्यकीय इस्पितळात दाखल करण्यात येते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही तो वाचत नाही.

"या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. संशयित आरोपींची जबानी आणि हाती लागलेल्‍या पुराव्‍यांवरून तपास योग्‍य मार्गाने चालला आहे. या प्रकरणातील खऱ्या सूत्रधारांना लवकरच गजाआड केले जाईल. ती वेळ आता जवळ आलेली आहे."

- निनाद देऊलकर, पोलिस निरीक्षक (पर्वरी)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com