Goa Police: नाट्यमय गुन्ह्याचा पोलिसांकडून पर्दाफाश

चोरलेल्या मोबाईलमुळे तपासकार्य सोपे ; प्लायवूड व्यापाऱ्याची केली सुरक्षित सुटका
Goa Police: प्लायवूड व्यापाऱ्याची केली सुरक्षित सुटका
Goa Police: प्लायवूड व्यापाऱ्याची केली सुरक्षित सुटकाDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: प्लायवूड व्यावसायिकाचा (plywood) एखाद्या चित्रपटाच्या स्टाईलने अपहरण करून त्याच्या कुटुंबियाकडून 1 कोटीची खंडणी उकळल्याचा प्रयत्न, त्यांनी मोबाईल चोरून तसेच पत्नीला फोन करून केलेल्या चुकीमुळे अंगलट आला व ते पोलिसांच्या जाळ्यात सापडले. त्यांचा या नाट्यमय गुन्ह्याचा पर्दाफाश पोलिसांनी (Goa Police) अहोरात्र केलेल्या शोधकार्याने लागला. त्यांचा हा पूर्वनियोजित कट पोलिसांनी केलेल्या चपळाईमुळे फसला व कोट्यवधी लाटण्याचे रंगविलेले स्वप्ने धुळीस मिळाले. (Goa police foil conspiracy to recover ransom)

थिवी येथे असलेल्या ‘आशिर्वाद प्लायवूड’ या दुकानात नवीन पटेल हे एकटेच होते. दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास वाहन घेऊन चारजण प्लायवूड विकत घ्यायच्या बहाण्याने दुकानात आले. त्यांचा सुतार येणार असल्याचे सांगून ते गुन्हा करण्याची वाट बघत होते. त्याचवेळी पटेल हे दुकानात आत गेले असता या चौघांनी दुकानाचे शटर आतून खाली ओढले. काही क्षणातच त्यातील दोघांनी त्यांचे तोंड दाबून इतर दोघांनी शस्त्र व चाकूचा धाक दाखवला. त्यांच्याकडे पैशांची मागणी केली मात्र, त्यांनी नकार दिल्याने त्यांच्या डोळ्यावर पट्टी तसेच तोंडात कपड्याचा गोळा कोंबून ते घेऊन आलेल्या वाहनातून पटेल यांना घेऊन पसार झाले. ते थिवी येथून जुने गोवे दिशेने गेले.

संशयितांनी रस्त्याने चालत जाणाऱ्या दोघा मजुरांना वाटेत अडवले. त्या दोघांनाही त्यांनी गाडीत घेतले. त्यांच्याकडील मोबाईल घेऊन काही अंतरावर जाऊन वाहनातून त्यांना बाहेर ढकलून दिले. अपहरण केलेल्या नवीन पटेल यांना डोळ्यावर पट्टी व तोंडात कपड्याचा बोळा कोंबलेल्या स्थितीत गोवा आगशी येथील कोकोलोको या निर्मनुष्य परिसरातील एका इमारतीमध्ये नेऊन मंजुनाथ, सुजित व सुभाष हे तिथे राहिले. त्यानंतर बिरेंदर व निशांत हे भाडेपट्टीवर राहत असलेल्या काबेसा - सांताक्रुझ येथे गेले. तेथून बिरेंद्र याने नवीन पटेल याच्या पत्नीला फोन करून पतीच्या सुटकेसाठी एक कोटीची रक्कमेची मागणी करुन ती न दिल्यास त्यांची हत्या करू अशी धमकी दिली होती. या फोननंतर त्यांच्या नातेवाईकांनी कोलवाळ येथील पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.

अपहरण व खंडणीवुसलीची तक्रार दाखल होताच उत्तर गोवा पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी पोलिस यंत्रणा सक्रीय केली. पोलिस उपअधीक्षक, निरीक्षक तसेच पोलिसांची वेगवेगळी पथके स्थापन करून थिवी, जुने गोवे व आगशी या तिन्ही परिसरात शोध सुरू झाला होता. नवीनच्या पत्नीला संशयित बिरेंदर याने मोबाईलवरून केलेल्या फोनच्या आधारे केला होता त्याचा अत्याधुनिक तंत्रज्ञान याच्या सहाय्याने त्यांचा ठावठिकणा शोधण्यात आला. हा फोन सांताक्रुझ परिसरातील काबेसा या भागातून आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी हा परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली. शोध घेत असताना संशयित बिरेंदर हा गुन्हेगार असल्‍याचे व एका पूर्वीच्या गुन्ह्यात असल्याचे पोलिस कॉन्स्टेबलने ओळखले. त्याला व त्याच्यासोबत असलेल्या निशान याला ताब्यात घेऊन पोलिस स्थानकात आणले.

या दोघांच्या सखोल चौकशीनंतर संशयित बिरेंदर याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर दुसरा संशयित निशांत हा सुद्धा नवीन पटेलकडे पूर्वी कामगार असल्याचे निष्पन्न झाले. बिरेंदर याने नवीन पटेल याला आगशी येथील एका निर्जनस्थळी ठेवण्यात आल्याचे व इतर संशयित तेथेच असल्याचे सांगताच दोघांना घेऊन पोलिस त्या ठिकाणी गेले. वास्तव्य नसलेल्या त्या इमारतीच्या सर्व बाजूनी पोलिसांनी वेढा घातला. बिरेंदर व निशांत या दोघाना पोलिसांसमवेत बघितल्याने त्यांचे साथीदारही पोलिसांना शरण आले.

सर्वांना पोलिस स्थानकात आणून प्रत्येकाची चौकशी केल्यावर पैशांसाठी हे कृत्य केल्याची कबुली दिली. एक कोटीची मागणी करण्यात आली होती मात्र त्यावर घासाघीस होऊन १० ते २० लाख तरी पदरात पडतील असा अंदाज होता असे प्राथमिक चौकशीत सांगितले आहे. हा गुन्हा संशयितांनी कोणाच्या सांगण्यावरून किंवा पटेल याचे कोणासी वैमनस्य आहे या अंगानेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अटक केलेल्या संशयितांपैकी काहीजण सोडेक्सो या आहार पुरविणाऱ्या कंपनीकडे कामाला आहेत अशी माहिती पोलिसांसमोर आली आहे.

पोलिस हवालदार निलंबित

पटेल याचे अपहरण करून त्याला वाहनातून घेऊन जाताना अपहरणकर्त्यांनी मजुराचा मोबाईल चोरला होता. या मोबाईलच्या चोरीप्रकरणी त्याने जवळच्या जुने गोवे पोलिस स्थानकात तक्रार देण्यात गेला होता. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या पोलिस हवालदार संतोष जाधव याने त्याची तक्रार दाखल करून घेतली नाही व त्याला परत पाठवले. तक्रारदार मजूर असल्याने तो खोटे सांगत असल्याचा निष्कर्ष काढून ही तक्रार दाखल केली नाही. या अपहरण व खंडणी प्रकरणाच्या तपासावेळी बिरेंदर याच्याकडून जप्त करण्यात आलेला मोबाईल हा ‘त्या’ मजुराचा होता. पोलिस हवालदार संतोष जाधव याने कामात निष्काळजीपणा केल्याबद्दल त्याला निलंबित करण्यात आले आहे.

कामगारांची पाश्‍वभूमी तपासा

व्यावसायिकांनी कामगारांना कामावर ठेवताना त्याच्या पार्श्‍वभूमीची तपासणी करावी. त्यासाठी त्यांनी जवळच्या पोलिस स्थानकात ही माहिती देऊन त्याची खातरजमा करून घ्यावी. राज्यात भाडेपट्टीवर खोल्या देणाऱ्या मालकांनी भाडेकरूची पार्श्‍वभूमीची माहिती तपासून घ्यावी. पोलिसही यासंदर्भात लवकरच भाडेकरूंची तपासणी मोहीम सुरू करणार आहे. कोविड काळात ही तपासणी शिथिल झाली होती ती पुन्हा सुरू केली जाईल असे पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com