Goa Crime News: अनैतिक संबंध, अमली पदार्थ व्यवहार; तरुणावर गोळीबार

Goa Crime News: बेतोड्यातील घटना : वेगवेगळ्या पथकांद्वारे पोलिस तपास गतिमान
Crime
Crime Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime News:

बेतोडा येथील चाररस्ता जंक्शनपासून पाठलाग करत दुचाकीस्वार सचिन सुभाष कुर्टीकर (३२ वर्षे) याच्यावर फिल्मी स्टाईलने पिस्तुलातून गोळी झाडून दोघे हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. शेजाऱ्यांबरोबर झालेल्या भांडणातून झाल्याचा संशय जखमी सचिनने व्यक्त केला आहे. असे असले तरी कथित अनैतिक संबंध आणि ड्रग्स व्यवहाराचीही किनार आहे.

हल्लेखोरांबाबत काही धागेदोरे हाती लागले असून लवकरच त्यांना गजाआड केले जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. ऐन पहाटे झालेल्या या घटनेने खळबळ उडाली असून फोंडा परिसरात हल्ल्याबाबत दिवसभर चर्चा सुरू होती.

खांडेपार येथील पास्कॉल फार्म येथे राहणारा सचिन कुर्टीकर हा बेतोडा येथील एका कंपनीत चालक म्हणून कामाला असून नेहमीप्रमाणे आज पहाटे 5.30 च्या सुमारास कामावर दुचाकीने निघाला. त्यावेळी रस्त्यावर काळोख होता तसेच

Crime
Margao Fire News: मडगावात स्टेशनरी दुकान खाक

वाहनांची रहदारीही नव्हती. बेतोडा येथील चाररस्ता जंक्शनवर तो पोहोचला असता, त्याला या जंक्शनवर दुचाकी घेऊन दोन युवक थांबलेले दिसले. त्यांनी डोक्यावर हेल्मेट घातले होते. काळोख असल्याने त्याला ते कोण आहेत, हे ओळखता आले नाही. या जंक्शनवरून तो पुढे गेला असता ते दुचाकीवरील दोघे युवक आपला पाठलाग करत असल्याचे त्याला दिसून आले. त्या दोघांनी सचिनवर गोळीबार केला.

फोंड्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेचा पंचनामा केला. पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर आणि दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी घटनास्थळी जाऊन या प्रकरणाची माहिती घेतली आणि तपासकाम सुरू केले.

Crime
Fire At Cashew Farm: डिचोलीत काजू बागायतींना आग

जखमी सचिनवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असून अजून धोका टळलेला नाही. त्याची जबानी तपासकामासाठी महत्त्वाची असल्याने डॉक्टरांच्या परवानगीने आज (८ मार्च) दुपारी पोलिसांनी जबानी नोंदवली. फोंडा पोलिसांनी हल्लेखोरांना शोधून काढण्यासाठी खांडेपार परिसर पिंजून काढला.

महत्त्वाचे धागेदोरे हाती

हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके स्थापन केली आहेत. हल्लेखोरांबाबत काही माहिती हाती लागली असून, त्या दिशेने तपास सुरू आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ज्ञ व ठसेतज्ज्ञांद्वारे पुरावे जमा केले आहेत. घटनेच्या सभोवतालची माहिती अत्याधुनिक तांत्रिक सर्व्हेलन्स, इंटेलिजन्स तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने घेण्यात येत असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

ड्रग्स व्यवहाराचीही किनार

सचिन कुर्टीकर याच्यावर झालेला हल्ला हा ड्रग्स व्यवहारातूनही झाला असल्याची चर्चा खांडेपार परिसरात सुरू आहे. गेल्या काही वर्षांत फोंडा व आजूबाजूच्या परिसरात ड्रग्सचा व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे फोंडा पोलिसांनी यासंदर्भात माहिती मिळविण्यासाठी गुप्तहेर यंत्रणा अधिक सक्रिय केली आहे.

शेजाऱ्यांशी झाले होते भांडण :

सचिनने दिलेल्या जबानीत, हा हल्ला शेजाऱ्यांबरोबर काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणातून झाल्याचा संशय आहे, त्याने व्यक्त केला आहे. त्याच्या कुटुंबीयांनीही शेजाऱ्यांवरच संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे चौकशीसाठी कुर्टीकर कुटुंबाबरोबर भांडण झालेल्या कुटुंबाच्या सदस्यांनाही चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा नोंद

हल्लेखोर कोणत्या रस्त्याने पसार झाले, याची माहिती स्थापन केलेल्या पथकांच्या मदतीने घेण्यात येत आहे. अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध फोंडा पोलिसांनी भादंसंच्या कलम ३०७ नुसार खुनाचा प्रयत्न, कटकारस्थान (कलम १२०बी) व हल्ल्यासाठी पिस्तूल वापरल्याने शस्त्रास्त्रविरोधी कायद्याखाली (कलम ३,२५ व २७) गुन्हा दाखल केला आहे.

गाडीच्या डिकीत ड्रग्सची चर्चा

सचिनच्या दुचाकीच्या डिकीत अमली पदार्थ सापडल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. मात्र, पोलिसांनी त्याला दुजोरा दिलेला नाही. अमली पदार्थांची देवघेव फोंडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू असून कदाचित त्यातूनच दुश्मनी उकरून काढून हा जीवघेणा हल्ला झाला असावा, या दृष्टीकोनातूनही तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वादग्रस्त व्यक्तिमत्त्व

सचिन कुर्टीकर याचा स्वभाव वादग्रस्त होता, अशी माहिती समोर आली आहे. महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधातून त्याला जबर मारहाणही झाली होती. त्यातून सावरतो न सावरतो, तोच हा जीवघेणा हल्ला त्याच्यावर झाल्याची चर्चा आहे.

कट पूर्वनियोजित : पोलिसांचा कयास

हा हल्ला जेथे करण्यात आला, त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे हल्लेखोरांनी पूर्वनियोजन करून चलाखपणे हा हल्ला केला असावा, असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे कुचकामी

ज्या ठिकाणी सचिनवर पिस्तुलाने गोळी झाडली, तेथून काही अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरा आहे. त्यामुळे पोलिसांनी धावाधाव करून या कॅमेऱ्याच्या फुटेजमधून माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न केला असता, हे कॅमेरे नादुरुस्त असल्याचे आढळले. त्यामुळे तपासकामात अडचणी आल्या. या जंक्शनवरील तसेच इतर रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा शोध घेतला. मात्र, हल्लेखोरांबाबत ठोस माहिती मिळू शकली नाही.

अंधारात मदतीसाठी याचना

गोळी लागल्यामुळे सचिन काही अंतरावर जाऊन दुचाकीसह कोसळला. रस्त्यावर अंधार होता आणि मदतीसाठीही कोणी नव्हते. त्याच स्थितीत तो ‘हेल्प, हेल्प’ असे ओरडत होता. त्यावेळी फोंडा बसस्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या एका चारचाकी वाहनचालकाने या घटनेची माहिती फोंडा पोलिसांना दिली. १०८ रुग्णवाहिका येण्यास उशीर झाल्याने पोलिस वाहनानेच त्याला गोमेकॉत दाखल करण्यात आले.

गोळी काखेतून निघून छातीतून पडली बाहेर

दोघे हल्लेखोर सचिनच्या दुचाकीजवळ पोहोचल्यावर त्यातील एकाने पिस्तुलाने बेछूट गोळी झाडली. ही गोळी सचिनच्या काखेत घुसून छातीच्या बाजूने बाहेर आली आणि ती सचिनच्या दुचाकीच्या स्पीडोमीटरमध्ये घुसली. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून मागच्या मागे वळण घेऊन पसार झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com