Goa Ganesh chaturthi 2023: राज्यात फटाक्यांवर रात्री 8 ते 10 या वेळेत बंदी

Goa Ganesh chaturthi 2023: चतुर्थीचा सण तोंडावर येऊन ठेपला आहे. या उत्‍सवात फटाक्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
Goa Ganesh chaturthi 2023
Goa Ganesh chaturthi 2023Dainik Gomantak

Goa Ganesh chaturthi 2023: चतुर्थीचा सण तोंडावर येऊन ठेपला आहे. या उत्‍सवात फटाक्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पण फटाक्यांचे घातक परिणाम लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार उत्तर गोव्याच्या ‘सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्स’ने निर्बंध जारी केले आहे.

Goa Ganesh chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023: ढवळी येथे यंदा प्रथमच चतुर्थी बाजाराचे आयोजन

त्यानुसार चतुर्थीसह दिवाळी व इतर सणांच्या काळात रात्री 8 ते 10 असे दोन तास फटाके वाजवण्यास बंदी घातली आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना फटाके वाजवण्यासंदर्भात निर्देश जारी केले होते.

नाताळ आणि नववर्ष स्वागताच्या काळात मध्यरात्री ११.५५ ते १२.३० वाजेपर्यंत फटाके वाजवण्यावर बंदी घातली आहे. असा प्रकार घडल्यास त्या भागाचे पोलिस अधीक्षक आणि अधिकारी जबाबदार राहतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आता गणेश चतुर्थी, दिवाळी उत्‍सवाच्‍या काळातही फटाके वापरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

निर्बंध का? : फटाक्यांमध्ये ‘बेरियम’ नावाची ज्वलनशील रासायनिक पावडर वापरली जाते. यामुळे वायूप्रदूषण होते. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात फटाक्यांच्या माळा फोडत राहिल्यास त्याचे घातक परिणाम सर्वांवरच होतात.

विशेषतः फटाक्यांच्या आवाजामुळे पाळीव प्राणी, भटके प्राणी अचानक घाबरतात. वृद्ध आणि आजारी लोकांना प्रचंड त्रास होतो. फटाक्यांच्या आवाजाने घाबरलेले पक्षी त्या भागातून कायमचे निघून जातात. शिवाय दुर्घटना घडण्‍याचीही शक्‍यता असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com