Fire In Goa: गोव्यात आगीचे सत्र सुरूच- कुडचडे येथील भुसारी दुकानाला आग, पाच लाखांचे नुकसान

दिवसभरातील चौथी घटना
Fire In Goa
Fire In GoaDainik Gomantak

आग लागण्याची आजच्या दिवसातील चौथी घटना घडली असून राज्यात आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येतेय.

आज संध्याकाळी सुमारे साडेसातच्या सुमाराला कुडचडे मासळी मार्केट शेजारील इमारतीतील किराणा दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. कुडचडे येथील अग्निशामक दलाच्या पथकाने मोठी मेहनत करून आग आटोक्यात आणली. मात्र दुकानातील सर्व सामान आगीत खाक झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार सतीश नाईक यांच्या मालकीचे हे दुकान असून ते संध्याकाळी आपल्या दुकानात काम करीत असताना त्यांना अचानक दुकानाच्या मागील भागातून धूर येत असल्याचे दिसून आले व अचानक आगीने मोठा पेट घेतल्याने तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी नळाच्या पाण्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न केला.

पण आग आटोक्यात येत नसल्याने कुडचडे अग्निशामक दलाला याची माहिती दिली असता कुडचडे अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली सदर आग विझविण्यासाठी कुडचडे अग्निशामक दलाच्या दोन गाड्या व मडगाव अग्निशामक दलाची एक गाडी मिळून तीन गाड्या लागल्याचे कुडचडे अग्निशामक दलाचे निरीक्षक दामोदर जांबावलीकर यांनी सांगितले.

Fire In Goa
Goa Pharma Job Fair: फार्मा जॉब फेअरला उत्स्फुर्त प्रतिसाद, 17 कंपन्यांसह 1700 उमेदवारांची उपस्थिती

दुकानातील संपूर्ण आग विझविण्यात आली असून दुकानातील सर्व सामान बाहेर काढले असून नुकसानीचा अंदाज आत्ताच सांगता येत नसला तरी दुकान मालकाने सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले असल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी जांबावलीकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com