Goa Pharma Job Fair: फार्मा जॉब फेअरला उत्स्फुर्त प्रतिसाद, 17 कंपन्यांसह 1700 उमेदवारांची उपस्थिती

आमदार तथा गोवा आयडीसीचे अध्यक्ष श्री रेजिनाल्डो लॉरेंस यांच्या उपस्थितीत जॉब फेअरचे उद्घाटन
Pharma Job Fair
Pharma Job FairDainik Gomantak
Published on
Updated on

आज गोवा फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन द्वारे वेर्णा इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वेर्णा इंडस्ट्रीज असोसिएशन हॉलमध्ये फार्मा जॉब फेअर आयोजित करण्यात आला होता.

अशा प्रकारचा पहिला जॉब फेअर आयोजित केल्याबद्दल जीआयडीसी चेअरमन श्री रेजिनाल्डो लॉरेंस, यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. रोजगारात स्थानिकांचा अधिक सहभाग असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

या जॉब फेअरचे उद्घाटन आमदार तथा गोवा आयडीसीचे अध्यक्ष श्री रेजिनाल्डो लॉरेंस, गोवा एफडीए संचालक ज्योती सरदेसाई, यांच्या सोबत गोवा फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण खुल्लर आणि वेर्णा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष प्रदिपदा कोस्टा यांच्या उपस्थितीत झाले.

या फार्मा जॉब फेअरला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. तब्बल 1700 जणांनी उपस्थिती दर्शवली होती. तर या जॉब फेअरमध्ये 17 फार्मा कंपन्यांनी भाग घेतला होता.

Pharma Job Fair
Pharma Job FairDainik Gomantak

यात सहभागी झालेल्या कंपन्या:-

सिप्ला, मार्क्सन्स, इंडोको, एफडीसी, मायक्रो लॅब, ल्युपिन, कलोरकॉन, एनक्युब येथीकल्स, ब्लू क्रॉस, ग्लेनमार्क, झायदस लाइफ सायन्सेस लि, शिफर आणि मेनेझिस, सनोफी, अब्बोट्ट, फायबर युनिकेम, जीनो फार्मा आदी कंपन्या सहभागी झाल्या होत्या.

फार्मा कंपन्यांनी गोवा फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनद्वारे आणि वेर्णा इंडस्ट्रीज असोसिएशनद्वारे फार्मा क्षेत्रातील इच्छुकांसाठी या रोजगार उपक्रम राबवला होता. गोवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि गोवा सरकारनेही याला पाठिंबा दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com