Save Mhadai Save Goa: मुख्यमंत्र्याकडून कर्नाटकात प्रचार अयोग्य

प्रशांत नाईक ः सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा संघटनेतर्फे निषेध
Save Goa Save Mhadai
Save Goa Save MhadaiDainik Gomantak

CM Pramod Sawant in Karanataka ज्या मंचावरून कर्नाटक म्हादई पाणी वाटपाचा वाद सामंजस्याने सोडविला आणि आता आम्हाला पाणी वळविण्यापासून कोणीच रोखू शकत नाहीत, असे कर्नाटकचे मंत्री उघडपणे सांगतात, त्याच व्यासपीठावरून या सरकारला परत सत्तेवर आणा, अशी मागणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत करतात ही बाब अत्यंत दुर्दैवी असून मुख्यमंत्र्यांची कृती हा निव्वळ गोवाद्रोह असून त्यांच्या या गुन्ह्याला माफी नाही, अशी प्रतिक्रिया सेव्ह म्हादई सेव्ह गोवा या संघटनेचे नेते प्रशांत नाईक यांनी व्यक्त केली.

आज मडगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नाईक यांनी मुख्यमंत्री सावंत हे सूर्याजी पिसाळ असे संबोधित अशा गद्दारांस आता जनताच धडा शिकवणार, असे म्हणत त्यांचा जाहीर नाही निषेध केला.

मुख्यमंत्री सावंत हे शिवाजी महाराजांचे गोडवे गातात, पण प्रत्यक्षात शिवाजी महाराजांच्या राज्याला फितुरीचा सुरुंग लावणाऱ्या सूर्याजी पिसाळ यांची भूमिका ते निभावतात.

जर कर्नाटकच्या मंत्र्यांनी जाहिरपणे मांडलेली भूमिका आमचे मुख्यमंत्री मुकाट्याने मान्य करतात, तर उद्या सर्वोच्च न्यायालयात गोव्याची बाजू कणखरपणे कसे मांडतील? असा प्रश्नही त्यांनी केला.

Save Goa Save Mhadai
Mahadayi Water Dispute: परवान्यांशिवाय म्हादईचे पाणी वळविणे अशक्य

...विश्‍वासघात नाही!

सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा संघटनेच्या सासष्टी तालुक्याचे निमंत्रक सेराफीन कोता यांनी मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी गोवेकरांना कर्नाटक समोर विकल्याचा आरोप करताना ज्यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई म्हादईचा प्रश्न सुटला, असे म्हणत असताना मुख्यमंत्र्यांनी त्याचे म्हणणे खोडून का काढले नाही? असा सवाल केला तर प्रतिमा कुतिन्हो यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्यावर विश्‍वास नाही, असे सांगितले. यावेळी विकास भगत हेही उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com