Land Grab Case: अखेर जमिन हडप प्रकरणाची उद्यापासून आयोगासमोर सुनावणी...

निवृत्त न्यायाधीश व्ही. के. जाधव करणार पोलिस तपासाची पडताळणी
Land grab case SIT
Land grab case SIT Dainik Gomantak
Published on
Updated on

Land Grab Case: गोव्यातील जमिन हडप प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने नियुक्त केलेल्या एकसदस्यीय आयोगाचे काम उद्यापासून सुरू होत आहे. निवृत्त न्यायाधीश व्ही. के. जाधव यांच्यासमोर उद्या, बुधवार १८ जानेवारीपासून या प्रकरणांची सुनावणी होणार आहे. पोलिस उपअधीक्ष जमिन हडप प्रकरणातील विविध केसेस बुधवारी न्या. व्ही. के. जाधव यांच्यासमोर सादर करणार आहेत.

Land grab case SIT
Goa Assembly Session : असा होता अधिवेशनाचा दुसरा दिवस; जाणून घ्या दिवसभरातील अपडेट

ईडीसी पाटो-पणजी येथील ‘स्पेस’ इमारतीत कार्यालय सुरू झाले आहे. या आयोगाची घोषणा सरकारने दोन महिन्यांपूर्वीच केली होती. मात्र, आयोगासाठी लागणाऱ्या साधनसुविधा व कर्मचारी वर्गाला मंजुरी नसल्याने हे कार्यालय त्वरित सुरू होऊ शकले नव्हते. गेल्या महिन्यातच सरकारने या कार्यालयासाठी हंगामी तत्वावर कर्मचारी वर्ग नेमला आहे. आयोग या प्रकरणातील पोलिसांच्या प्रत्येक तपासकामाची पडताळणी करणार आहे. त्यातील त्रुटींची माहिती पोलिसांना देऊन त्यावरील निर्णय पुढील चार महिन्यांत घेण्याची अट आहे.

Land grab case SIT
Zuari-Bridge: नव्या झुआरी पुलावरून सेल्फी घेण्याचा मोह पर्यटकांना आवरेना

कागदोपत्री पडताळणी करून तक्रारदार तथा जमीनमालकाला जमिनी परत देण्यात येतील. न्यायालयीन प्रक्रियेला बरेच दिवस लागण्याची शक्यता असल्याने तोडगा काढता यावा म्हणून ही सोय केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल असून त्याच्याविरुद्ध आतापर्यंत सहा गुन्हे दाखल आहेत. पैकी पाच प्रकरणांत त्याला जामीन मिळाला आहे व सध्या तो शेवटच्या गुन्ह्यात कोठडीत आहे. शिवाय माजी मामलेदार (बार्देश), काणकोणचे माजी उपनिबंधक तसेच तीन पुराभिलेख कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Comunidade Land Grab Allegations
Goa Land Grab Scam
Bicholim Land Fraud Goa
Goa High Court denies bail in land scam case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com