म्हापशात कार्निव्हल उत्साहात

मिरवणुकीतील चित्ररथांतून पर्यावरण बचावचा संदेश
Mapusa Carnival
Mapusa CarnivalDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: म्‍हापसा शहरात काल मंगळवारी कार्निव्हल मिरवणूक उत्साहपूर्ण वातावरणात झाली. यानिमित्ताने चित्ररथ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लोक मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी झाले होते. (Carnival festivities in Mapusa)

Mapusa Carnival
पृथ्वीवरील 50 टक्के वन्यजीव गेल्या 40 वर्षांत नष्ट

उत्तर गोव्याचे (Goa) माजी पोलिस उपअधीक्षक फिंटन डिसोझा यांच्या हस्ते या मिरवणुकीचा प्रारंभ झाला. या प्रसंगी नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर व आमदार ज्योशुआ डिसोझा उपस्थित होते. या मिरवणुकीत कौटुंबिक तथा सांघिक चित्ररथांचा समावेश होता. विनोदी, मनोरंजनात्मक स्वरूपाचे चित्ररथांचे प्रदर्शन झाले. कोरोना महामारी, पर्यावरण रक्षण, वृक्षसंवर्धन, गोमंतकीय जनमानसात मासळीला असलेले महत्त्व इत्यादी विषय त्या अनुषंगाने जनमानसासमोर मांडण्यात आले होते. गोव्यातील खाजेकार, पारंपरिक पद्धतीने काजूबिया भाजणे, सुक्या माशांचे उत्पादन इत्यादी विषय त्या अंतर्गत मांडण्यात आले होते. म्हापसा (Mapusa) शहरातील या चार दिवसीय कार्निव्हल (Goa Carnival) उत्सवात विविधांगी मनोरंजनात्मक, सांगीतिक तथा नृत्यप्रधान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. डीजे आणि लाइव्ह बॅण्ड कार्यक्रमांचाही त्यामध्ये समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com