'आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स' ('I Have Electric Dreams') चित्रपटाने भारताच्या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्ण मयूर पुरस्कार जिंकला आहे. रुपेरी पडद्यावरुन सामाजिक, भौगोलिक वास्तव कलाकृतीच्या माध्यमातून जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या चित्रपटास ‘सुवर्ण मयूर’ देऊन गौरविण्यात येते. यंदा या पुरस्कारासाठी 'आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.
(Film 'I Have Electric Dreams' wins the Golden Peacock for best film at the 53rd International Film Festival of India)
पुरस्कार विजेते निवडण्यासाठी महत्त्वाची भुमिका 'यांनी' निभावली
सुवर्ण मयूर हा पुरस्कार विजेता निवडण्यासाठीचे काम इस्त्रायली लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक नदाव लॅपिड, अमेरिकन निर्माते जिंको गोटोह, फ्रेंच चित्रपट संकलक पास्केल चॅव्हन्स, फ्रेंच डॉक्युमेंटरी फिल्म मेकर, चित्रपट समीक्षक आणि पत्रकार जेव्हियर अँगुलो बर्चुरेन आणि भारताचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्याकडे सोपवण्यात आले होते. त्यांनी ती यशस्वीरित्या निभावली.
खालील पंधरा चित्रपट आहेत 'सुवर्ण मयुर' पुरस्काराच्या शर्यतीत
परफेक्ट नंबर (2022), रेड शूज (2022), ए मायनर (2022), नो एन्ड (2021), मेडिटेरेन फिवर (2022), व्हेन दी वेव्ज आर गॉन (2022), आय हॅव इलेक्ट्रीक ड्रिम्स (2022), कोल्ड अॅज मार्बल (2022), सेवन डॉग्ज (2021), मारिया : द ओशन एंजेल (2022), द काश्मीर फाईल्स (2022), नेझोह (2022), द स्टोरीटेलर (2022), कुरंगू पेडल (2022), द लाईन (2022)
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.