मुरगाव पालिका इमारतीत पावसाचे पाणी; कर्मचाऱ्यांची एकच धांदल

मुरगाव पालिका कार्यालयात तुंबले पाणी
Mormugao Municipality
Mormugao MunicipalityDainik Gomantak

मुरगाव पालिका इमारतीत पावसाच्या पाण्यामुळे कर्मचारीवर्ग यांची आज धांदल उडाली. मुरगाव पालिका इमारतीचे नूतनीकरण सुरू असल्याने काल रात्री आणि आज पडलेल्या पावसामुळे पालिका कार्यालयात पाणी तुंबले त्यामुळे कामकाजावर परिणाम झाला.

मुरगाव पालिका इमारतीचे नूतनीकरणाचे काम सुरू असून इमारतीचा एक भाग पहिला मजल्यावर पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. दुसऱ्या भागात मुख्याधिकारी, नगराध्यक्ष कार्यालयाबरोबर इतर पालिका विभागांची कार्यालये आहेत. तळमजल्यावर सध्या नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पहिल्या मजल्यावर मुरगाव हायस्कूल वगळल्यास आता जनता वाचनालय, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, टॅक्सेशन विभाग, रिकव्हरी विभाग, आदी कार्यालये असून खाली केली नसल्याने हा भाग नूतनीकरणासाठी घेतला नाही.

जोपर्यंत ही कार्यालये खाली होत नाही. तोपर्यंत काम करता येणार नाही. वास्तविक मुरगाव पालिका कार्यालयांना हेडलॅण्ड सडा येथे नवीन मार्केट कॉम्प्लेक्स मध्ये जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र तेथे वीज आणि पाणी जोडणी नसल्याने मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी तेथे जाणे सोयीस्कर समजले नाही. त्यामुळे पालिका इमारतीतच राहणे पसंत केले आहे.

Mormugao Municipality
प्रमोद मुतालिक यांच्यावरील गोव्यातील प्रवेशबंदी वाढवली

दरम्यान पालिका इमारतीच्या छपराला पावसाळ्यात गळती लागतेच लागते. त्यामुळे काल रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे पालिका मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष कार्यालयात पाणीच पाणी झाले. तसेच जन्मदाखला, ट्रेड लायसन,घरपट्टी परवाना देत असलेला कार्यालयातही पाणी साचल्याने कामकाजावर परिणाम झाला. आपल्या वैयक्तिक कामासाठी आलेल्या लोकांना याचा त्रास झाला. संगणकावर प्लास्टिक घालून ठेवण्याची पाळी कर्मचाऱ्यांवर आली. दरम्यान कागदपत्रांची नुकसान टाळण्यासाठी मुख्याधिकारी यांचे कक्ष तात्पुरते अन्य ठिकाणी हलवण्यात आले आहे. तर नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये पाणी तुंबल्याने नगराध्यक्षांची तारांबळ उडाली.

Mormugao Municipality
मडगावचे माजी मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांना पालिकेकडून निरोप

मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात गळती लागण्याची शक्यता असल्याने कागदपत्रांची जवळपास काळजी घेत प्रशासकीय कामे संथ गतीने चालू ठेवली आहे. दरम्यान संध्याकाळी येथील काही कार्यालयांचे तळमजल्यावर स्थलांतर करण्यात आले आहे. याविषयी नगराध्यक्षांना विचारले असता पालिका कार्यालयीन भागाचे काम अजून हाती घेतले नसल्याने काल रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे कार्यालयात पाणीच पाणी झाले आहे. याविषयी ठेकेदाराला कल्पना दिली असून हे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com