Mapusa Crime: मालमत्तेचा वादातून सार्वजनिक ठिकाणी मारामारी; 5 जणांना अटक

म्हापसा पोलिसांची कारवाई
Mapusa crime
Mapusa crime Dainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Police: सार्वजनिक ठिकाणी मारामारी करणाऱ्या पाच जणांना म्हापसा पोलिसांनी गुरूवारी अटक केली.

7 जून रोजी रात्री 11 वाजून 12 मिनिटांनी बार्देश तालुक्यातील डमेलोडो कानका येथे मारामारीचा प्रकार घडला होता. म्हापशाचे SDPO जिवबा दळवी यांनी ही माहिती दिली.

Mapusa crime
Manoj Parab: सिव्हील कोड, कोमुनिनाद कायदा रद्द करणार का? मनोज परब यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

या प्रकरणातील संशयित आरोपी ताज मोहम्मद शेख (वय 50 वर्षे), फैजल ताज मोहम्मद शेख (वय 29 वर्षे), हिना ताज मोहम्मद शेख (वय 28 वर्षे), नीता वसंत नाईक (28 वर्षे), फैजल शेख (वय 26 वर्षे), यांच्यासह जाहिद शेख (वय 33 वर्षे), फैजान शेख (वय 28 वर्षे), अमीन शेख (वय 46 वर्षे) हे या प्रकरणातील संशयित आरोपी आहेत.

हे सर्व डी'मेलोडो, कानका, बार्देश येथील रहिवासी आहेत. संपत्तीच्या वादातून हा प्रकार झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी मोकळ्या जागेत हे भांडण सुरू होते. हत्यारे घेऊन हे लोक आमनेसामने आले होते.

दोन्ही गटांकडून एकमेकांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. काठी, चाकू, लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली होती.

कपडे फाडणे, शारिरीक इजा करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, वाहनांचे नुकसान करणए, वैयक्तिक वस्तूंचे व निवासी जागेचे नुकसान करणे, बाटल्या फेकणे असे प्रकार या भांडणात घडले होते. याचा त्रास आजूबाजूच्या नागरिकांना झाला. त्यामुळे म्हापसा पोलीस ठाण्यात तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.​​

Mapusa crime
Anjuna Police Arrest: युगांडाच्या 26 वर्षीय तरूणीला हणजुणे पोलिसांनी केली अटक; 'हे' आहे कारण...

पैकी ताज, फैजल, झाहिद, फैजान, आमिन यांना गुरूवारी अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

ताज, फैजल, हीना, नीता यांचा मालमत्तेवरून झाहिद शेख, फैजान शेख, आमिन शेख यांच्याशी वाद आहे. म्हापसा पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. त्यामुळे हे भांडण सोडवले गेले.

म्हापशाचे पोलिस निरीक्षक शितकांत नायक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या पाच जणांना अटक केली आहे. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन, म्हापशाचे एसडीपीओ जिवबा दळवी, पोलिस निरीक्षक शितकांत नायक यांच्या देखरेखीखाली एएसआय रिकी फर्नांडिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com