Anjuna Police Arrest: युगांडाच्या 26 वर्षीय तरूणीला हणजुणे पोलिसांनी केली अटक; 'हे' आहे कारण...

युगांडाच्या दुतावासालाही दिली माहिती
Anjuna Police Arrested Uganda Girl in Goa
Anjuna Police Arrested Uganda Girl in Goa Dainik Gomantak

Anjuna Police Arrested Uganda Girl in Goa: उत्तर गोव्यातील हणजुणे येथे पोलिसांनी एका परदेशी तरूणीला अटक केली आहे. प्रॉसी मावेज्जे, बुकीर्वा असे तिचे नाव आहे. ती 26 वर्षांची असून मूळची युगांडा या देशाची नागरिक आहे.

तिच्या व्हिसाची मुदत संपुनही ती येथे राहत होती. त्यामुळे तिच्यावर हणजुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Anjuna Police Arrested Uganda Girl in Goa
Monsoon In Goa: केरळमध्ये मॉन्सून दाखल; आता गोव्यात 'या' दिवशी येणार

म्हापशाचे एसडीपीओ जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार हणजुणे पोलिसांनी संबंधित युवतीविरोधात फॉरेनर्स ऑर्डर 1948 मधील यू/एस 7 (1), 7 (3) (iii) फॉरेनर्स ऍक्ट 1946 च्या कलम 14 नुसार दंडनीय गुन्हा नोंदवला आहे.

हणजुणे पोलिसांचे एक पथक बार्देश तालुक्यातील शिवोली येथील बामनवाडो परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलिसांनी प्रॉसी ही तरूणी संशयास्पद वाटली. पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली.

तेव्हा तिच्याकडे प्रवासी कागदपत्रे नसल्याचे समोर आले. ती सध्या बामनवाडो भागात वास्तव्यास होती.

Anjuna Police Arrested Uganda Girl in Goa
Manoj Parab: सिव्हील कोड, कोमुनिनाद कायदा रद्द करणार का? मनोज परब यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

त्यामुळे पोलिसांनी युगांडा दुतावासाला याबाबत माहिती देण्याची विनंती केली. त्यानंतर ती व्हिसाची मुदत उलटूनही येथे वास्तव्यास असल्याचे उघडकीस झाले. त्यामुळे पोलिसांनी तिला अटक केली आहे.

या प्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई यांच्या देखरेखीखाली पोलिस उपनिरीक्षक आशिष पोरोब करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com