Goa Miles App: टॅक्‍सीचालकाला किनारपट्टीवर अडविल्‍याबद्दल वाद; दक्षिणेतही रणधुमाळी

Taxi Driver Dispute In Goa: ‘गोवा माईल्‍स’ टॅक्‍सी किनाऱ्यावर पार्किंगला विरोध
Taxi Driver Dispute In Goa: ‘गोवा माईल्‍स’ टॅक्‍सी किनाऱ्यावर पार्किंगला विरोध
Goa Taxi Business FightDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा माईल्‍स टॅक्‍सीचालक आणि स्‍थानिक टॅक्‍सीचालक यांच्‍यात पेडण्‍यात वाद झालेला असतानाच आज दक्षिण गोव्‍यातही स्‍थानिक टॅक्‍सीवाले आणि गोवा माईल्‍स यांच्‍यात रणधुमाळी झाली.

सदर प्रकरण काेलवा पाेलिस स्‍थानकापर्यंत पोहचल्‍यानंतर पोलिसांनी त्‍यात मध्‍यस्‍थी करताना गोवा माईल्‍स टॅक्‍सीचालकांनी आपली वाहने किनारपट्टी भागात पार्क करून ठेवू नयेत, तसेच भाडे घेऊन आलेल्‍या गोवा माईल्‍स टॅक्‍सीचालकांना स्‍थानिक टॅक्‍सीवाल्‍यांनी सतावू नये, असा तोडगा काढण्‍यात आला.

बुधवारी किनारपट्टी भागात भाडे घेऊन आलेल्‍या गोवा माईल्‍स टॅक्‍सीचालकाला अडविल्‍याबद्दल वाद निर्माण झाला हाेता. याप्रकरणी कोलवा पाेलिस स्‍थानकावर तक्रारही नाेंदविली हाेती.

Taxi Driver Dispute In Goa: ‘गोवा माईल्‍स’ टॅक्‍सी किनाऱ्यावर पार्किंगला विरोध
Colva Police: वाहतुकीला अडथळा, पोलिसांची कारवाई

यावर तोडगा काढण्‍यासाठी पाेलिसांनी दाेन्‍ही बाजूच्‍या पदाधिकाऱ्यांना बोलाविले होते. यावेळी स्‍थानिक टॅक्‍सीचालकांनी सांगितले की, गाेवा माईल्‍सचे टॅक्‍सीचालक प्रवाशांना घेऊन किनारपट्टी भागात येतात नंतर त्‍यांना सोडल्‍यावर तिथेच गाड्या पार्क करतात, शिवाय हॉटेलमधील ग्राहक़ही स्‍वत:कडे ओढतात, अशी तक्रार केली.

त्‍यामुळे त्‍यांना किनारपट्टी भागातून पर्यटकांना घेऊन जाण्‍यास बंदी घालावी, अशी मागणी केली. दरम्यान,टॅक्सीचालकांतील वाद दिवसेंदिवस वाढतच असून यावर सर्वमान्य तोडगा निघावा,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Taxi Driver Dispute In Goa: ‘गोवा माईल्‍स’ टॅक्‍सी किनाऱ्यावर पार्किंगला विरोध
Goa Miles App: टॅक्सी व्यावसायिकांची धारगळमध्ये धुमश्‍चक्री; दोन्ही गटांमध्ये बाचाबाची

बेकायदेशीरपणा नाही : गोवा माईल्स

याप्रश्‍नी गोवा माईल्‍स ही ॲपधारक सेवा असून कुठल्‍याही पर्यटक किंवा ग्राहकाने ॲपवर टॅक्‍सी बुक केल्‍यास त्‍यांना घेऊन जाणे आमचे कर्तव्‍य आहे आणि त्‍यात कुठलाही बेकायदेशीरपणा नाही, असा दावा गोवा माईल्स टॅक्सीचालकांनी केला आहे. स्‍थानिक टॅक्‍सीचालकांनी आज बाणावलीचे आमदार व्‍हेंझी व्‍हिएगस तसेच दक्षिण गोव्‍याचे खासदार कॅ. विरियाताे फर्नांडिस यांना निवेदन दिले आणि या प्रश्‍नावर ताेडगा काढावा, अशी मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com