Panaji News : मान्‍सूनपूर्व कामांना मुहूर्त कधी? पणजीत 50 टक्के कामे पूर्ण

मनपा : गटारांची सफाई; दररोज काढली जातेय एक-दोन ट्रक माती
Cleaning of drains started
Cleaning of drains startedSandip Desai
Published on
Updated on

पणजी शहरात महानगरपालिकेतर्फे 50 टक्के मान्सूनपूर्व कामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात येतेय. ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे 300 मीटर नव्या गटारांचे काम झाले आहे. त्यामुळे जुनी गटारे साफसफाईची कामे सध्या हाती घेण्यात आली आहेत.

महापौर रोहित मोन्सेरात, आयुक्त क्लेन मदेरा यांच्यासह मीसुद्धा या कामांची दररोज पाहणी करत आहे, अशी माहिती उपमहापौर संजीव नाईक यांनी ‘गोमन्तक''ला दिली.

‘स्मार्ट सिटी’अंतर्गत पहिल्या टप्प्यात मध्यवस्तीतील 300 मीटर गटारांचे आणि स्मार्ट रस्ता करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे जुन्या म्हणजेच पोर्तुगीजकालीन गटारांची स्थिती काय ती दिसून आली.

Cleaning of drains started
Sankhlim Municipality Election 2023 : साखळीत मुख्यमंत्र्यांचा दबदबा; उमेदवारीसाठी आज शेवटची मुदत

अनेक ठिकाणी या गटारांच्या कडा तुटून त्यांचा प्रवाह बुजत आल्याचे दिसून आले होते. स्मार्ट सिटीची कामे कंत्राटदारांमुळे होत असल्याने महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे सुमारे 300 मीटर गटार साफसफाई करण्याचे काम वाचले आहे. त्यामुळे उर्वरित कामांवर सध्या मनपा लक्ष देत असल्‍याचे नाईक म्हणाले.

धोकादायक फांद्या छाटण्‍याचे काम सुरू

पावसाळ्यात झाडाच्या फांद्या धोकादायक ठरतात. वादळी वाऱ्यांमुळे फांद्या मोडून पडण्याची भीती असते. अशा फांद्या छाटण्‍याचे काम सुरू आहे. शिवाय नागरिकांकडून त्यांच्या स्वतःच्या जागेतील फांद्या किंवा झाडे धोकादायक वाटतात, त्याबाबत आलेल्या तक्रारींची दखलही महानगरपालिका घेत असल्याचे सांगत नाईक म्हणाले सध्या महापौर आणि आयुक्त मनपा आणि स्मार्ट सिटीच्या कामांवर लक्ष ठेवून आहेत.

Cleaning of drains started
Ponda Muncipality Election 2023 : फोंड्यात भाजप, मगो, कॉंग्रेस सज्ज; एकूण उमेदवार 41 वर

सुशोभीकरण : शहराच्या हद्दीत येणाऱ्या काही भागात अजूनही जी-२० शिखर परिषदेसाठी सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी साचते, त्या ठिकाणची आणि त्याच्या प्रमुख प्रवाहाच्या गटारांची साफसफाई करण्याचे काम सध्या सुरू आहे.

आझाद मैदानाभोवतालच्या गटारांची साफसफाई करण्यात येत असून, दररोज एक ते दोन ट्रक माती गटारातून बाहेर काढली जात असल्याचे उपमहापौर नाईक यांनी सांगितले.

पावसाळा सुरू होण्यास आणखी दीड ते पावणेदोन महिन्याचा अवधी आहे. लवकरच मनपाकडून धोकादायक इमारतींची पाहणी करण्‍यात येणार आहे. तसेच संबंधित इमारतींना नोटीस बजावली जाईल.

- संजीव नाईक, पणजीचे उपमहापौर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com