Goa Cashew Feni: '..जशी मिरची गोव्यात योगायोगाने आली तसाच काजूही', पारंपरिक फेणीची कथा, चव आणि इतिहास

Cashew Feni in Goa: वाझ यांनी प्रेक्षकांना फेणीच्या इतिहासाच्या गाभ्यात नेले, जिथे या पेयाची मुळे आंतरखंडीय मसाला मार्गांपर्यंत पोचतात, ज्या मार्गांवरून काजू आणि मिरची गोव्यात आले.
Goa Cashew Feni
Goa Cashew FeniDainik Gomantak
Published on
Updated on

Feni history Goa:अनेक शतके, गोव्याची प्रसिद्ध फेणी हे पेय फक्त एक देशी दारू म्हणूनच ओळखली गेली. पण या पेयामागे असलेला वैश्विक इतिहास, औषधी महत्त्व आणि सांस्कृतिक वारसा फार कमी लोकांपर्यंत पोहोचला. भूशास्त्रज्ञ म्हणून काम केलेल्या हॅन्जल वाझ यांची ओळख आता ‘फेणी दोतोर’ म्हणून झाली आहे.

काझुलो फेणी’ डिस्टिलरीचे ते संस्थापकही आहेत. म्युझियम ऑफ गोवा, पिळर्ण येथे आयोजित एका खास कार्यक्रमात ‘साव्हर फ्लेवर: फेणीज अरोमॅटिक जर्नी’ हे फेणीचा स्वाद समजून घेण्याचे आणि त्यासंबंधीच्या कथा ऐकण्याचे अनोखे सत्र त्यांनी घेतले.

या कार्यक्रमात वाझ यांनी फेणीच्या उत्पत्तीपासून ते तिच्या आजच्या रूपापर्यंतचा प्रवास उलगडला. “फेणी हे एक पेय नसून ती स्थलांतरची, मसाल्यांच्या व्यापारयात्रेची, आयुर्वेदाची आणि पारंपरिक ज्ञानातून जन्मलेली अमूल्य भेट आहे. आपण जुनी चुकीची माहिती विसरून या पेयाचा खरा इतिहास समजून घेण्याची आता वेळ आली आहे” असे मत वाझ यांनी मांडले.

वाझ यांनी प्रेक्षकांना फेणीच्या इतिहासाच्या गाभ्यात नेले, जिथे या पेयाची मुळे आंतरखंडीय मसाला मार्गांपर्यंत पोचतात, ज्या मार्गांवरून काजू आणि मिरची गोव्यात आले. दक्षिण अमेरिकेतील मसाला व्यापाराशी नातं जोडत वाझ म्हणाले, “जशी मिरची गोव्यात योगायोगाने आली तसाच काजूही, पण आपण त्यांचा जो वापर केला, तो काही योगायोग नव्हता.”

प्राचीन आयुर्वेदिक संकल्पना आणि आधुनिक प्रयोगशैली याबाबत बोलताना वाझ यांनी अनेक छुपे घटक आणि अपरिचित तंत्र उघड केले- जसे की बॉटॅनिकल डिस्टिलेशन आणि 'फॅट-वॉशिंग'. ही तंत्रे सध्या गोव्याच्या बदलत्या पेयसंस्कृतीत परत येत आहेत.

सार्सापरिला (Sarsaparilla) हे मूळ वापरून तयार करण्यात येणारी 'दुक्षिरी' ही फेणी, शरीरातील वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. “या सगळ्यात विशेष बाब म्हणजे, ही औषधी वनस्पती गोळा करणारे कधीच थेट डिस्टिलरला विक्री करत नसत. पूर्ण विक्री गुप्तपणे होत होती,” असं वाझ यांनी स्पष्ट केलं.

“दुक्षिरी हे केवळ मद्यपेयं नाही. हे असे पेय आहेत, ज्याची मुळे इतिहासात आहेत. हे विस्मरणात गेलेल्या मुळांपासून जन्मलेले पेय आहे आणि आता ते गोव्यात नव्याने जन्म घेत आहे” असे ते म्हणाले.

Goa Cashew Feni
Cashew Feni: पारंपरिक फेणीला आधुनिक साज! निर्मितीला मिळतेय यांत्रिकीकरणाची जोड

“मी आणि माझ्या काही मित्रांनी 'दुक्षिरी' प्याल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हा सर्वांना पहाटे लवकरच जाग आली, आणि ही गोष्ट आमच्या गटात काही फारशी सामान्य नव्हती,” वाझ यांनी हा किस्सा सांगितल्यानंतर उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

वाझ यांच्या मते, जुन्या डिस्टिलरीज ह्या केवळ मद्य तयार करणाऱ्या जागा नव्हत्या तर त्या रसायनशास्त्रज्ञांच्या प्रयोगशाळा होत्या, जिथे वनस्पतींचा वापर करून फेणीचे स्वादांतर केले जायचे. आता ते स्वत: या मौल्यवान गोमंतकीय पेयाचं अस्सलपणा परत मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Goa Cashew Feni
Cashew Feni: पारंपरिक फेणीला आधुनिक साज! निर्मितीला मिळतेय यांत्रिकीकरणाची जोड

फेणी ही केवळ एक विक्री योग्य वस्तू नाही. ती आता अधिकाधिक डिस्टिलर्स, वनसंपत्ती गोळा करणारे, बारटेंडर्स, शेफ्स आणि गोष्ट सांगणारे यांनी एकत्र येऊन प्रयोग करण्याची बाब बनली आहे आणि या विशेष परंपरेचा विस्तार होण्याची आज गरज आहे. “जितके जास्त लोक या मिश्रणांशी खेळतील, तितकाच ह्या चळवळीचा विस्तार होईल.” असे वाझ यांचे म्हणणे होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com