...म्हणून गोव्यात कोरोनामुळे मृत्यू वाढले

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, मृत्यूमुखी पडलेल्या लोकांमध्ये लसीकरण न झालेल्यांचे प्रमाण अधिक आहे.
COVID-19 Vaccine
COVID-19 VaccineDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मागील आठ दिवसात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 70 टक्के रुग्णांचे लसीकरण झालेले नव्हते. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, मृत्यूमुखी पडलेल्या 26 प्रौढांपैकी 18 लोकांनी कोरोना लसीचा एकही डोस घेतला नव्हता. (Corona Vaccine News Update)

COVID-19 Vaccine
भरधाव ट्रकने दोन म्हशींना उडवलं

मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांपैकी 55 टक्के 70 आणि त्याहून अधिक वयोगटातील होते तर 45 टक्के 70 पेक्षा कमी वयाचे होते. यावर भाष्य करताना राज्य लसीकरण अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर म्हणाले, “लस (Vaccine) आपला कोरोना पासून बचाव करते असे फक्त आम्हीच म्हणत नाही आहोत तर जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) देखील हेच म्हणणे आहे. लस घेतल्यामुळे कोरोनाची (Coronavirus) लागण होत नाही असे नसले तरी शरीर कोरोना विरुद्ध लढण्यासाठी सक्षम होते. परिणामी मृत्यूचा धोका देखील कमी होतो.

COVID-19 Vaccine
उत्पल पर्रीकरांसाठी मिळालेली उमेदवारी सोडणार : वाल्मिकी नाईक

मागील 1 वर्षापासून राज्य सरकारने गोव्यात लसीकरण मोहीम राबवली आहे. गेल्या वर्षभरात राज्याची आरोग्य यंत्रणा अविरतपणे कोणतीच सुट्टी न घेता नागरिकांचे लसीकरण करत आहे. सध्या ही मोहीम 100 टक्क्यांकडे पोहोचली असून आत्तापर्यंत 97.48 टक्के नागरिकांचे संपूर्ण लसाकरण झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com