Inferior food बनवणारी आस्थापने रडारवर; मडगावात FDAचे छापे

अधिकाऱ्यांनी गैरप्रकाराविरोधात कारवाई सुरुच ठेवली असून, विविध भागांमधील उत्पादन ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.
Inferior food
Inferior foodDainik Gomantak
Published on
Updated on

Panjim: अन्न आणि औषध प्रशासन खात्याच्या अधिकाऱ्यांनी गैरप्रकाराविरोधात कारवाई सुरुच ठेवली असून आज मडगावातील विविध भागांमधील व्यावसायिकांच्या उत्पादन ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. परोठा, सामोसा, चपाती आणि श्‍वर्मासारख्या जिन्नसासाठी वापरले जाणारे पीटा ब्रेड आदींच्या वापरासह अशा प्रकारचे खाद्य पदार्थ करणाऱ्या आस्थापनांवर छापे टाकण्यातआले.

दिकरपाली-मडगाव येथील अरविंद सहानी यांच्या आस्थापनावर छापा टाकला. यावेळी तेथे उघड्यावर खाद्य पदार्थ तयार करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. अशा प्रकारे आरोग्यास अपायकारक वातावरणात पदार्थ तयार करून ते मडगावमधील विविध ठिकाणच्या आघाडीच्या हॉटेल्स, दुकाने, सुपरमार्केटस्‌ यांना पुरविण्यात येत असल्याचे त्यांना आढळून आले होते.

स्वच्छतेबाबतचे नियम न पाळता हा सर्व व्यवहार चालू असल्याचे अधिकाऱ्यांना दिसून आले. सहानी यांच्या दिकरपाली येथील ठिकाणावरून त्यांनी मालाची 110 पाकिटे जप्त (Seized) केली.

Inferior food
Goa Politics: काँग्रेसमधील शिस्त व नेतृत्व अभावामुळेच पक्षांतरे - मांद्रेकर

अशाच प्रकारे शांती नगर येथे श्रावणकुमार नामक व्यावसायिकाच्या आस्थापनात असाच गैरव्यवहार आढळून आल्याने अधिकाऱ्यांनी तेथील 75 किलो सामोसे नष्ट केले. तर मांडोपा नावेली येथील हफजर के. या व्यक्तीच्या पीटा ब्रेड तयार करण्याच्या उत्पादन ठिकाणावरून 1200 पीटा ब्रेड जप्त केले.

Inferior food
Udaipur येथे आयोजित 'गोवा @ 60' रोड शोला उत्कृष्ट प्रतिसाद!

हौसिंग बोर्ड, घोगळ येथील जयसिंग राजपूत या व्यावसायिकाच्या चपाती तयार करण्याच्या ठिकाणावर छापा टाकण्यात आला. तेथील 500 चपात्या जप्त करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. हे सर्वजण स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करण्याबरोबरच विना परवाना हा व्यवसाय चालवित होते असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या कारवाईत रिचर्ड नोरोन्हा, राजीव कोरडे, अमित मांद्रेकर, प्रिया कोमरपंत, स्वप्निल फातर्पेकर या अधिकाऱ्यांनी भाग घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com