Udaipur येथे आयोजित 'गोवा @ 60' रोड शोला उत्कृष्ट प्रतिसाद!

गोमंतकीय कलाकारांनी लोकनृत्याचे सादरीकरण केले.
Deepak Narvekar
Deepak NarvekarDainik Gomantak

Goa Tourism Development Corporation: गोवा पर्यटन विकास महामंडळाने माहिती आणि प्रसिध्दी खात्यातर्फे उदयपूर (राजस्थान) येथे आयोजित गोवा @ 60 या आशयावरील रोड शोचा शुभारंभ काल राजस्थानच्या पर्यटन खात्याच्या उपसंचालक शीखा सक्सेना यांच्या हस्ते झाला. सेलेब्रेशन मॉल, उदयपूर येथे आयोजित या सोहळ्यावेळी राजस्थानच्या माहिती आणि प्रसिध्दी खात्याचे उपसंचालक कमलेश शर्मा हेही उपस्थित होेते. या रोड शोला उत्तम प्रतिसाद लाभला.

हा शो या ठिकाणी 18 सप्टेंबर 2022 पर्यंत चालू राहणार असून तो सर्व लोकांसाठी खुला असेल. शुभारंभी सोहळ्यानंतर कार्यक्रमस्थळी गोमंतकीय कलाकारांनी लोकनृत्याचे सादरीकरण केले त्याला उपस्थित प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला.

Deepak Narvekar
Girish Chodankar : काँग्रेसमध्ये गद्दारांनी घातले निष्ठेचे श्राद्ध!

याप्रसंगी गोवा पर्यटन खात्याचे उपसंचालक राजेश काळे, जीटीडीसीचे (Goa Tourism Development Corporation) उपसरव्यवस्थापक दीपक नार्वेकर, माहिती अधिकारी ऑल्विन परेरा, गोवा पर्यटन खात्याचे सहायक पर्यटन संचालक रॉडलीन मास्कारेन्हास आणि माहिती खात्याचे सहायक माहिती अधिकारी किरण मुनानकर आदी उपस्थित होते.

Deepak Narvekar
Goa BJP : काँग्रेस आमदारांच्या बंडानंतर भाजपाकडून कार्यकर्त्यांची मनधरणी

रोड शोमुळे विविध शहरांमधील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात संबंध जुळतात. तसेच मुक्तीनंतरच्या काळात राज्याने साधलेल्या नेत्रदीपक प्रगतीचे दर्शनही देशवासियाना घडविणे शक्य होते. या रोड शोच्या माध्यमातून गोव्याच्या मुक्तीसाठी स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या योगदानाची माहिती लोकांना करून देण्याचा हेतू आहे, असे जीटीडीसीचे उप सरव्यवस्थापक दीपक नार्वेकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com