Atal Setu: महत्वाची बातमी! अटल सेतूची एक लेन उद्या खुली होणार, वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा?

सरकारने अटल सेतू अचानक बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने पणजीत पुन्हा वाहतुकीची कोंडी सुरू झाली आहे.
Atal Setu
Atal Setu Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

सरकारने अटल सेतू अचानक बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने पणजीत पुन्हा वाहतुकीची कोंडी सुरू झाली आहे.  मंगळवारी आणि बुधवारी देखील विविध मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली . डांबरीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत पूल बंद असल्याने चालक, प्रवाशांना कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे.

दरम्यान, पणजी, पर्वरी परिसरात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता अटल सेतूची एक लेन उद्या (गुरूवार, दि.06 एप्रिल) खुली होणार असल्याची माहिती सूत्रांच्या वतीने देण्यात आली आहे.

अटल सेतू अचानक बंद ठेवल्यामुळे पर्वरी मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे गुरूवारपासून पर्वरीच्या दिशेने जाणारी एक लेन वाहतुकीसाठी खुली केली जाणार असल्याची माहिती सूत्रांच्या वतीने देण्यात आली आहे.

एक लेन वाहतुकीसाठी खुली झाल्यास या परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गुरूवारी सकाळी आठ वाजता एक लेन खुली केली जाईल अशी माहिती उत्तर जिल्हाधिकारी मामू हागे यांनी दिली आहे.

बुधवारी, 5 मार्च रोजी सकाळी पणजी तील दिवजा सर्कल, रायबंदर रोड, पर्वरी रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

दरम्यान, मंगळवारी देखील वाहतूक कोंडी झाली होती. डांबरीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत पूल बंद असल्याने चालक, प्रवाशांना कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे. अटल सेतू हा पुढील काही दिवस बंद असल्याने लोकांनी नेहमीच्या वेळेपेक्षा अगोदर घरातून बाहेर पडावे, असे आवाहन यापूर्वी प्रशासनाने केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Porvorim Elevated Road Traffic Solution
Porvorim Elevated Road
Porvorim elevated road traffic
Atal Asra Scheme Goa Latest
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com