वास्को: निज गोयकार फौज या बिगर सरकारी संस्थेच्या तक्रारीला अनुसरून चिखली पंचायत, अन्न आणि औषध संचालनालय, वजन माप खाते व आरोग्य खाते यांनी संयुक्तरित्या दाबोळी येथे वेगवेगळ्या फूड स्टॉल, चिकन मटन स्टॉल, फास्ट फूड व इतर दुकानांची संयुक्तरीत्या पाहणी केली असता बहुतेक दुकानांना परवाना नसल्याचे आढळून आले.
( FDA and Health Department jointly raid Dabolim food stalls, 80 percent illegal)
निज गोयकार फौज या संघटनेने आज चिखली पंचायतीत जाऊन दाबोळी परिसरात जो चिखली पंचायत क्षेत्रात येतो त्या ठिकाणी बेकायदेशीर दुकाने थाटून व्यवहार थाटण्यात आल्याचे पंचायत सचिवांच्या निदर्शनास आणून दिले व तक्रार दाखल केली होती. दरम्यान या तक्रारीला अनुसरून आज चिखली पंचायत, अन्न आणि औषध संचालनालय, वजन व माप खाते, आरोग्य खाते व निज गुयगार फौज या संघटनेचे सुरेश नाईक व इतरांनी मिळून दाबोळी परिसरातील काही दुकानांची पाहणी केली असता त्या दुकानांचे बिंग फुटले.
यात 80 टक्के दुकाने बेकायदेशीर असल्याचे आढळून आले. तसेच एका मालकाची चार-चार दुकाने या दुकानांना परवाना नाही. तराजूला परवा नाही तसेच दुकान परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले असल्याचे आढळून आले. मात्र दुकानदार दिवसाकाठी लाखो रुपयांचा व्यवसाय करत आहेत. मात्र सदर बेकायदेशीर असल्याचे निदर्शनास आले.
दिवसासाठी लाखो रुपयांचा गल्ला, मात्र पंचायतीच्या तिजोरीत या दुकानदाराचा एकही पैसा जमा होत नाही. चिखली पंचायतीच्या क्षेत्रात 90 टक्के बेकायदेशीर दुकाने चिखली पंच सदस्य, सरपंच आदींच्या वरदहस्ताने थाटण्यात आली आहे. सदर दुकान मालकांनी पंचायतीच्या पंच, सरपंच आदींची जवळीक करून दुकाने थाटली असल्याचे उघड झाल्याचे निज गोयकार फौजचे सुरेश नाईक यांनी सांगितले. यात 80 टक्के जास्त दुकाने बिगरगोमंतकियाची असल्याचे ते म्हणाले.
माजी पंचायत मंडळाकडून या दुकानदारांना शय देण्यात आल्यानेच बेकायदेशीर व्यवहाराला ऊत आल्याचे सुरेश नाईक यांनी सांगितले. चिखली पंचायत सचिवांच्या निदर्शनास आणून दिले असता सदर बिंग फुटले. याविषयी निज गोयकार फौजेचे लोकांनी आभार मानले आहे. या दुकानावर कडक कारवाई करून त्यांच्याकडून पंचायतीला येणे वसूल करून घेण्यात यावे अशी मागणी लोकांनी केली आहे असे सुरेश नाईक यांनी सांगितले.
दरम्यान निज गोयकार फौज या बिगर सरकारी संघटनेच्या तक्रारीला अनुसरून पंचायत सचिवांनी पंचायत क्षेत्रातील दुकानदारांना नोटीस बहाल केली आहे व बेकायदेशीर व्यवहार बंद करण्याचा आदेश या नोटिसीद्वारे देण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.