Fatorpa: फातर्पा पंचाच्या कारकून पतीची बदली रद्द; अंतर्गत राजकारणातून प्रकरण चिघळलं

राजकीय दबावातून बदली रद्द केल्याचा आरोप
Fatorpa
FatorpaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: पत्नी पंच असल्याचा फायदा उठवून पंचायतीच्या कारभारात लुडबुड करत असल्याचा आरोप होत असलेले फातर्पा पंचायतीचे कारकून संतोष नाईक यांची या पंचायतीतून केलेली बदली तडकाफडकी रद्द केल्याचा आदेश पंचायत संचालक कार्यालयातून जारी झाल्याने एकच गडबड उडाली असून राजकीय दबावातून ही बदली रद्द केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

(Fatorpa Panchayat Clerk Santosh Naik transfer is cancelled)

संतोष नाईक हे या पंचायतीच्या माजी सरपंच व विद्यमान पंच मेदिनी नाईक यांचे पती असून नोव्हेंबर महिन्यात पंचायत संचालकांच्या कर्यालयातून निघालेल्या एका आदेशाद्वारे त्यांची बदली फातर्पा पंचायतीतून बाळ्ळी पंचायतीत करण्यात आली होती. तर त्यांच्या जागी बाळ्ळी पंचायतीचे कारकून अतीश नाईक यांची नियुक्ती केली होती. वेगवेगळ्या एकूण 16 पंचायतींच्या कारकूनाच्या बदलीचा आदेश काढण्यात आला होता.

5 डिसेंबर रोजी बाळ्ळी पंचायतीच्या सचिवांनी अतिश नाईक यांना पदावरून रिलिव्ह केल्याचा आदेशही जारी केला होता. मात्र त्याच्या एक दिवस पूर्वी म्हणजे 4 डिसेंबर रोजी संतोष नाईक आणि आतिष नाईक यांच्या बदलीचा आदेश रद्द केल्याचा आदेश पंचायत संचालकांनी जारी केल्यामुळे यामागे राजकीय हात असल्याचा आरोप आता होत आहे.

Fatorpa
Panjim: स्मार्ट की बेबद्यांची सिटी? गोवा विद्यापीठाच्या प्राध्यापकांची पोस्ट चर्चेत, युरी आलेमावही म्हणाले...

संतोष नाईक हे साधे कारकून असूनही आपल्या पत्नीच्या पदाचा गैरफायदा उठवून ते पंचायत कारभारात लुडबुड करतात अशा आशयाच्या तक्रारी त्यांच्या विरोधात या पूर्वी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली होती.

Fatorpa
Sanguem: पाण्याची तीव्र टंचाई; नागरिकांंमध्ये उसळली संतापाची लाट

या बदली रद्द आदेशाविरोधात केपेचे आमदार एल्टन डिकोस्टा यांनी तीव्र नाराजी व्यक्त करतांना महिला पंच सदस्यांच्या पदाचा फायदा उठवून त्यांचे पती किंवा अन्य पुरुष नातेवाईक पंचायत कारभारात लुडबुड करत असतील तर पंचायत सचिवांनी त्याबद्दल त्वरित कारवाई करावी अशा आशयाचा आदेश यापुर्वी पंचायत खात्यानेच जारी केला होता. असे असतानाही फातर्पा पंचायतीत ही लुडबुड कशी खपवून घेतली जाते असा सवाल करून ही बदली रद्द करण्यामागे कुणाचा हात आहे त्याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com