Vijai Sardesai: 18 हजार हेक्‍टर पडीक शेतजमीन लागवडीखाली आणण्‍याची गरज : विजय सरदेसाई

फातोर्डा येथे वार्षिक शेतकापणी प्रक्रियेला सुरुवात
Vijai Sardesai
Vijai SardesaiDainik Gomantak

गाेव्‍यात 18 हजार हेक्‍टर शेतजमीन पडीक असून ती लागवडीखाली आणण्‍यासाठी सरकारकडून प्रयत्‍न होण्‍याची गरज आहे. पण दुर्दैवाने सरकार या बाबतीत फारसे गंभीर नाही अशी प्रतिक्रिया गोवा फाॅरवर्डचे अध्‍यक्ष आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी व्‍यक्‍त केली.

गोवा सरकार जे कृषी धोरण आखत आहे त्‍यात येत्‍या 25 वर्षात गोव्‍यात शेती कशाप्रकारची असणार आणि त्‍याचा राज्‍यातील शेतकर्‍यांना काय फायदा होणार याचे प्रतिबिंब या धोरणात प्रतिबिंबित होण्‍याची गरज आहे असे सरदेसाई म्‍हणाले.

Vijai Sardesai
37th National Games: आशियाई पदक विजेता मिथुन मंजुनाथ पराभूत

फातोर्डा येथील वार्षिक शेतकापणी प्रक्रियेला आज सरदेसाई यांनी सुरुवात केली.

त्‍यावेळी बोलताना सरदेसाई म्‍हणाले, फातोर्डात आम्‍ही सामुदायिक शेती हा प्रयोग काही प्रमाणात यशस्‍वी केलेला आहे, त्‍यामुळे भाताचे पीक घेतल्‍यानंतर या मतदारसंघातील शेतकरी भाजीचे पीक घेतात.

हे पीक घेण्‍यासाठी शेतकर्‍यांना पाणी उपलब्‍ध व्‍हावे यासाठी सहा ठिकाणी विहिरी पुनर्जिवित केल्‍या जाणार असून पाण्‍याची साठवण व्‍हावी यासाठी दोन बांधही बांधून काढले जाणार आहेत असे त्‍यांनी सांगितले.

विधानसभेत मी सामुदायिक कंत्राटी शेती हा विषय चर्चेस आणला असता, कृषी मंत्र्‍यांनी कुळांचा विषय काढून या महत्‍वाच्‍या चर्चेला बगल दिली. दोन दिवसांपूर्वी फातोर्डात आलेले असताना वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी जी शेती पडीक आहे.

तिथे सोलर पॅनल घालण्‍याची परवानगी देणार असे स्‍पष्‍ट केले आहे. मी या पर्यायी वीज यंत्रणेच्‍या विरोधात नाही.

मात्र गोव्‍यात कृषी उत्‍पादन वाढावे यासाठी राज्‍याचे कृषीमंत्री काहीच प्रयत्‍न करणार नाहीत याची खात्री असल्‍यामुळेच वीजमंत्र्‍यांनी ही घोषणा केली असावी असे वाटू लागले आहे असे सरदेसाई म्‍हणाले.

राज्‍याच्‍या कृषी धाेरणावर बोलताना सरदेसाई म्‍हणाले, राज्‍यात सध्‍या ज्‍या कृषी योजना आहेत त्‍याचे एकत्रित संकलन करुन तेच कृषी धोरण म्‍हणून विधानसभेत मांडायचा कृषीमंत्र्‍यांनी प्रयत्‍न केला.

मात्र त्‍यावेळी मी त्‍याला आक्षेप घेतला त्‍यामुळेच आता या धोरणासंदर्भात लाेकांकडून सुचना मागवून घेतल्‍या जात आहेत. कृषीधोरण म्‍हणजे चालू असलेल्‍या योजना लोकांसमोर आणणे नव्‍हे तर भविष्‍यात या उद्योगाबद्दल सरकारचा काय दृष्‍टीकोन आहे हे त्‍यात दिसून आले पाहिजे.

माझ्‍यामुळेच या धोरणासाठी आता लोकांच्‍या सुचना घेतल्‍या जात आहेत. सरकार जर शेतीच्‍या बाबतीत गंभीर असले तर मी त्‍यांना हवे ते सहकार्य देण्‍यास तयार आहे असेही सरदेसाई म्‍हणाले.

Vijai Sardesai
Valpoi Municipal Council: वाळपई नगराध्यक्षपदी प्रसन्ना गावस यांची बिनविरोध निवड

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com