

सासष्टी: फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमबाहेरील खुल्या जागेत जॉगिंग ट्रॅक आहे. या ट्रॅकवर नियमित शेकडो लोक जॉगिंगसाठी येत असतात. यात वृद्ध, तरुण, महिला व मुलांचाही समावेश असतो. मात्र, या परिसरात शौचालयाची व्यवस्था नसल्याने, अनेकांची गैरसोय होत आहे.
यासंदर्भात, समाजसेवक मिलाग्रेस फर्नांडिस यांनी सांगितले की, क्रीडा मंत्री रमेश तवडकर यांनी याची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर शौचालयाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यांनी पुढे सांगितले की, जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला मोठा खड्डा खणलेला आहे. त्यात कचरा टाकून त्याला आग लावली जाते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
येथे नवीन जॉगिंग ट्रॅक टाकण्यात आला आहे, ही चांगली बाब असली तरी शौचालयाची सुविधा नसल्याने जॉगिंगसाठी येणाऱ्या लोकांसह तेथे क्रिकेट व फुटबॉल खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांनाही त्रास होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.