10 वर्षात फातोर्ड्याचा विकास खुंटला, सर्व समस्यांवर तोडगा काढू; प्रमोद सावंत

जो कष्ट करेल त्याला फळ हे ब्रीद घेऊन भाजप सरकार पुढच्या योजना आखणार; प्रमोद सावंत
Fatorda Damu Naik
Fatorda Damu NaikDainik gomantak
Published on
Updated on

मडगाव : फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांच्यावर शाब्दिक हल्ला करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मागच्या 10 वर्षात त्यांनी गोयकारपणाच्या नावाखाली फक्त फटींगपणाच केली असा आरोप केला.

सावंत यांनी आज भाजपचे उमेदवार दामू नाईक (Damu Naik) यांच्या जाहिरनाम्याचे प्रकाशन केले. यावेळी ठाण्याचे आमदार संजय केळकर हेही उपस्थित होते. यावेळी बोलताना सावंत म्हणाले, मागच्या 10 वर्षात फातोर्ड्याचा विकास खुंटला, त्यामुळे आता फातोर्ड्याचा (Fatorda) सर्वांगीण विकास करण्यासाठी दामू नाईक यांना निवडून द्यावे. येत्या पाच वर्षात सोनसोड्यासह सर्व समस्यांवर तोडगा काढू असे ते म्हणाले.

Fatorda Damu Naik
'मुख्यमंत्र्यांचा पराभव करा, सगलानींना मंत्री बनवून साखळीचा विकास घडवा'

यावेळी दामू नाईक यांनी रखडलेल्या बस स्थानकाचा प्रश्न आपण निवडून आल्यास मार्गी लावू असे सांगून शेतकऱ्यांना सुविधा मिळण्यासाठी केंद्राची स्थापना करू असे सांगितले. सोनसोड्यावर जो कचरा प्रक्रिया प्रकल्प चालू होता तो आणण्यास आपलाही हात होता असा जो आरोप होत आहे, त्यात तथ्य नसून त्यावेळी मी विरोधी पक्षाचा आमदार (MLA) असल्याने कुणी आपल्याला विश्वासात न घेता हा प्रकल्प आणला असा खुलासा केला.

Fatorda Damu Naik
गोमंतकीय जनता भाजपला सत्तेपासून दूर करणार, पटोले यांचा दावा

त्यापूर्वी मुख्यमंत्री सावंत यांनी गवळीवाड्यावर जाऊन घरोनघर प्रचारात भाग घेतला. जो कष्ट करेल त्याला फळ हे ब्रीद घेऊन भाजप (BJP) सरकार पुढच्या योजना आखणार असून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी फातोर्डेकरांनी दामू नाईक यांना निवडून आणावे असे आवाहन केले. यावेळी प्रसिद्ध कॉमेडीयन हंबर्ट याने भाजपात प्रवेश केला. फातोर्डाचा विकास भाजपकडूनच शक्य आहे असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com