Fatal Accident At Agonda
Fatal Accident At AgondaDainik Gomantak

आगोंद येथे भीषण अपघात! दुचाकीस्वार जागीच ठार, हरियाणाच्या कार चालकाला अटक

आगोंद येथे कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे.
Published on

Fatal Accident At Agonda 45 year old died

आगोंद येथे कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. याप्रकरणी कार चालकाला अटक करण्यात आली आहे. सकाळी हा अपघात झाला.

संजु नाईक गांवकर (वय 45) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

अर्जुन सिंग (रा. हरियाणा) असे या अपघात प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.

Fatal Accident At Agonda
Sonali Phogat Death Case: सोनाली फोगट हत्या प्रकरणातील आरोपी सुखविंदरला जायचंय हरियाणाला, न्यायालयात याचिका

खांडोळ्यात नाल्यात पडून एकाचा मृत्यू

गणपतीवाडा-खांडोळा येथे बुधवारी पहाटे शेताच्या बांधावरून चालताना हळदणवाडा (गावांत) येथील विनायक सावळो गावडे (वय 46 वर्षे) यांचा पाय घसरून ते खोल नाल्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. राहत्या घरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर सकाळी 7 च्या सुमारास ते शेतात एका साकवाच्या कडेला मृतावस्थेत आढळले.

स्थानिकांनी म्हार्दोळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक सुशांत सांगोडकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com