Goa Farming: आमोणेत शेतकऱ्यांनी केली आलीया मिरचीची लागवड; घेतले भरघोस उत्पन्न

ग्रामनिर्माण प्रकल्प; दोन हजार चौरस मीटर शेतजमिनीत भरघोस उत्पन्न : ‘वेदांता’ने पुरविले अर्थसाहाय्य
Goa Farming
Goa FarmingDainik Gomantak
Published on
Updated on

गेल्या दोन वर्षांपासून ‘वनराई’ ही पुणे येथील संस्था आमोणे, नावेली व बेतकी या गावांतील शेतकऱ्यांना शेती, फळबाग, परसबाग, भाजीपाला लागवड याविषयी मार्गदर्शन व प्रत्यक्ष सहकार्य करते. शौचालय बांधणी आदी ग्रामविकासाचे कार्यही सुरू असून या कामी शेतकऱ्यांना येथील वेदांता कंपनीकडून आर्थिक सहकार्य मिळत आहे.

Goa Farming
Accidents in Ponda : फोंड्यात परराज्यातील वाहनचालकांचेच जास्त अपघात; आतापर्यंत 36 घटनांची नोंद

जानेवारीत आमोणे येथील एक सुशिक्षित तरुण शेतकरी कृष्णा सिनारी यांच्या दोन हजार चौरस मीटर जमिनीत अत्याधुनिक पध्दतीने आलीया जातीच्या मिरचीची लागवड केली असून रोपांना सध्या फुले बहरली आहेत.

सिनारी यांना वेदांता कंपनीकडून खत, औषधे आणि बियाण्यांसाठी अर्थसाहाय्य प्राप्त झाले. अशाच प्रकारे इतर शेतकऱ्यांनीही ‘वनराई’च्या प्रतिनिधींचे मार्गदर्शन घेतल्यास आर्थिक लाभ होईल, असे वेदांता कंपनीचे अधिकारी मिलिंद बर्वे यांनी सांगितले.

110 शेतकऱ्यांना लाभ

काही दिवसांपूर्वी खरीब हंगामात आमोणे व नावेली गावात 110 शेतकऱ्यांसोबत वनराई संस्थेच्या प्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक पध्दतीने भाताची लागवड केली. या शेतकऱ्यांना उत्तम पीक मिळाल्याचे आमोणेचे माजी सरपंच तथा शेतकरी संदेश नाईक यांनी सांगितले.

वनराईचे प्रतिनिधी दौलत गिराम, शर्मिला गुरव यांनी 20 शेतकऱ्यांमार्फत एसआरआयअंतर्गत (श्री पध्दती) भात पिकाची लागवड केली. यात आमोणे येथील ब्रह्मेश्‍वर शेतकरी संघटनेतील शेतकऱ्यांच्या सहभाग होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com