Accidents in Ponda : फोंड्यात परराज्यातील वाहनचालकांचेच जास्त अपघात; आतापर्यंत 36 घटनांची नोंद

यंदा फोंडा आणि कुळे पोलिस स्थानकाच्या हद्दीत आतापर्यंत 36 अपघातांची नोंद झाली असून त्यातील काही सामोपचाराने मिटवण्यात आले पण बळीही गेल्याने अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
Accidents in Ponda
Accidents in PondaDainik Gomantak
Published on
Updated on

Accidents in Ponda : यंदा फोंडा आणि कुळे पोलिस स्थानकाच्या हद्दीत आतापर्यंत 36 अपघातांची नोंद झाली असून त्यातील काही सामोपचाराने मिटवण्यात आले पण बळीही गेल्याने अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग कुळे ते फोंडा व पणजी आणि मडगावला जात असून या मार्गावर तर अपघातांचे सत्रच सुरुच आहे. वाहनचालकांची निष्काळजीपणा हेच या अपघातांचे प्रमुख कारण ठरले आहे. भरधाव वाहने हाकणे आणि वाहतूक नियमांच्या उल्लंघनामुळेच सातत्याने अपघात होत आहेत. यात सरकारी अनास्थाही कारणीभूत ठरली आहे हे विशेष.

Accidents in Ponda
Vijai Sardesai : 'गुजरात कशाला, तुम्हाला खरचं सुप्रशासन शिकायंच असेल तर...'

डोंगर दऱ्यांचा अंदाज नाही

फोंडा तालुका हा डोंगर दऱ्यांचा प्रदेश असून येथील रस्त्यांचा अंदाज परराज्यातील वाहनचालकांना येत नाही, परिणामी अशा वाहनचालकांकडून जास्त अपघात होत आहेत. कुंडईतील दोन दिवसांपूर्वी झालेला अपघात हे त्याचेच द्योतक आहे. वाहने निष्काळजीपणे हाकणे आणि जोडीला दारुपान यामुळेही अपघात होत आहेत.

रस्ते बिकटच

फोडा शहरातील काही भागातील रस्ते अजूनही खोदलेल्या स्थितीत आहेत. असे रस्ते अपघातास कारणीभूत ठरत आहेत. रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी आणि बेशिस्तपणा नवख्या चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. फोंडा येथे वरचा बाजार परिसरात मार्केटजवळ बेशिस्तपणे वाहने पार्क केली जातात त्यामुळे पादचाऱ्यांना ये जाण्यासाठी जागाही मिळत नाही. वाहतुक पोलिस उपस्थित असून चालकांचा बेशिस्तपणा अजूनही कमी झालेला नाही.

वाहन सावकाश आणि योग्य पद्धतीने चालवले तर अपघात होणारच नाहीत. म्हणून प्रत्येक वाहनचालकाने खबरदारी घ्यायला हवी.

- प्रकाश वासू नाईक, फोंडा

रस्तेही बऱ्याच ठिकाणी खराब आहेत. त्यातच भरधाव वाहन हाकण्याची पद्धत अपघाताला कारणीभूत ठरत आहे. म्हणून प्रत्येक वाहनचालकाने खबरदारी ही घ्यायलाच हवी.

- समीर जनार्दन गोवेकर , तिस्क - उसगाव

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com