Goa: स्वरांजली संगीत मैफलीला रसिकांची दाद

Goa: सभागृहात आयोजित स्वरांजली संगीत मैफलीस यंदाही रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
Music Concert
Music ConcertDainik Gomantak
Published on
Updated on

पद्मविभूषण डॉ. गंगुबाई हानगल व गान सरस्वती किशोरी आमोणकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गीत शकुन पणजी, युवा पणजी तसेच कला आणि संस्कृती संचालनालय, गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 14 ऑगस्ट रोजी मिनेझिस ब्रागांझा, सभागृहात आयोजित स्वरांजली संगीत (Music) मैफलीस यंदाही रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. पं. प्रसाद सावकार, उद्योजक डॉ. प्रफुल्ल हेदे, शशांक सुखटणकर, कला संस्कृती संचालक सगुण वेळीप आदी मान्यवर उपस्थित होते.

Music Concert
Google Doodle Today: गूगलची डूडलची Oskar Sala यांना अनोखी श्रद्धांजली; 'वन मैन ऑर्केस्ट्रा' बद्दल वाचा एका क्लिकवर

यावेळी डॉ. शकुंतला भरणे यांच्या ‘घुमटाचो नाद’ या युट्यूब (Youtube) गीताचे तसेच गीत शकुन या युट्यूब चॅनलचे पं. प्रसाद सावकार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर श्रीवल्लभ पाडगांवकर व प्रतीक धामस्कर यांनी मैफिलीची सुरुवात केली. नंतर उत्कर्ष नागवेकर, पं. अशो‍क नाडगीर यांनी गायन केले. त्यानंतर बेगम अख्तर व विदुषीरेखा सुर्य यांचे यावेळी व्याख्यान झाले.

पं. मनीष पिंगळे यांचे स्लाईड गिटार (Guitar) वादन व ''व्हॅली रिकॉल्स बँड'' (Valley Recalls Band) चे सादरीकरण हे कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. प्रशांत महाले (बासुरी), डॉ. नरेश मडगांवकर (संतूर) व डॉ. उदय कुलकर्णी (तबला) यांच्या अविष्कारात डॉ. शकुंतला भरणे यांचे ठुमरी बाज दाखवणारे गायन रसिकांना भावले.गौतमी कामत यांनी स्वागतगीत सादर केले. सनथ भरणे यांनी स्वागत केले. प्रविणा गांवकर स्वागतपर भाषण केले. मानसी वाळवे यांनी निवेदन केले. गीता नारकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Cutbona jetty sanitation issues Goa
Mapusa Market Nullah Cleaning
Goa Assembly Elections 2027
Goa Human Trafficking
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com