Google Doodle Today: गूगलची डूडलची Oskar Sala यांना अनोखी श्रद्धांजली; 'वन मैन ऑर्केस्ट्रा' बद्दल वाचा एका क्लिकवर

गुगलने ऑस्कर साला (Oskar Sala) यांच्या 112व्या जयंती निमित्त गुगलने डूडल बनवत श्रद्धांजली दिली आहे.
Google Doodle Today
Google Doodle TodayDainik Gomantak

गुगलने प्रसिद्ध जर्मन संगीतकार ऑस्कर साला यांच्या 112व्या जयंती निमित्त गुगलने सुंदर डुडल बनवत श्रद्धांजली वाहिली आहे. ऑस्कर साला (Oskar Sala) एक अभिनव संगीतकार आणि भौतिकशास्त्रज्ञही होते. ऑस्कर साला यांनी अनेक मालिका, रेडिओ तसेच चित्रपटांना संगीत दिले आहे. ते मिक्स्चर-ट्रुटोनियम (Mixture-Trutonium Instrument) नावाच्या वाद्यावर त्यांचे प्रभुत्व होते. (Google marks 112th birth anniversary physicist electronic music composer Oskar Sala news)

* ऑस्कर साला यांचा जीवनप्रवास
ऑस्कर साला यांचा जन्म 1910 साली जर्मनीमध्ये (Germany) झाला. त्यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्यांची आई गायिका आणि वडील नेत्र रोग तज्ज्ञ होते. त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षापासून संगीत (Music) बनवण्यास सुरुवात केली. ट्रुटोनियम नावाच्या वाद्याबद्दल ऐकल्यानंतर त्यांना त्या वाद्याची आवड निर्माण झाली. त्यांना या वाद्यातील तंत्रज्ञान आवडले होते. ऑस्कर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य ट्रुटोनियम (Trautonium) शिकण्यात आणि त्याला अधिक विकसित करण्यात घालवले.

Google Doodle Today
Priyanka Chopra Birthday: या चित्रपटात नकारात्मक भूमिका करून प्रियांकाचे बदलले नशीब

* ऑस्कर साला यांनी मिक्स्चर-ट्रुटोनियम वाद्याची निर्मिती केली
ऑस्कर साला यांचे शिक्षण सुरू असतांनाच मिक्स्चर-ट्रुटोनियम वाद्याची (Mixture-Trutonium Instrument) निर्मिती केली. हे वाद्य बनवतांना त्यांना त्यांच्या संगीतकार आणि इलेक्ट्रो इंजिनिअरच्या शिक्षणाचा खूप उपयोग झाला. त्यांनी बनवलेले संगीत सर्वांपेक्षा वेगळं होते. त्यांची शैली ही खुप वेगळी होती. त्यांनी बनवलेलं मिक्स्चर-ट्रुटोनियम वाद्य इतके समृद्ध होते की ते एकाच वेळी अनेक प्रकारचे आवाज काढू शकत होतं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com