Goa Weather Updates: गोवेकरांना दिलासा, तापमान घटले

पणजी येथे काल कमाल 34.5 डिग्री सेल्सियस तर किमान 23.4 डिग्री सेल्सियस एवढ्या तापमानाची नोंद झाली.
Goa Weather Updates,
Goa Weather Updates, Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: राज्यातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून उतार-चढाव सुरूच आहेत. गेले दोन दिवस उच्च तापमानामुळे हैराण झालेल्या गोमंतकीयांना मात्र काल, मंगळवारी दिलासा मिळाला. मंगळवारी तापमानात घट झाल्याची माहिती हवामान खात्याच्या वेधशाळेने दिली. पणजी येथे काल कमाल 34.5 डिग्री सेल्सियस तर किमान 23.4 डिग्री सेल्सियस एवढ्या तापमानाची नोंद झाली. (Goa Weather Updates)

Goa Weather Updates,
प्रदेशाध्यक्ष पदाला गिरीश चोडणकरांचा रामराम

मात्र, सोमवारी पणजीतील कमाल तापमान 37.8 डिग्री सेल्सियस तर किमान तापमान 23.4 डिग्री सेल्सियस एवढे नोंदविले होते. सध्या तापमानात जरी घट झाली असली तरी नागरिकांनी उन्हापासून बचावासाठी योग्य ती काळजी घेणे जरूरीचे आहे. लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांनी प्रामुख्याने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे.

Goa Weather Updates,
गोव्यात बेकायदा रेती वाहतुकीला अभय

पावसाची शक्यता

येत्या 24 तासांमध्ये कमाल आणि किमान तापमानात 1-2 अंश सेल्सियसने घसरण होण्याची शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेने रविवारी वर्तविली होती. पुढील 3-4 दिवसांत कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, 17 मार्चपासून 2-3 दिवस राज्यात एक-दोन ठिकाणी ढगाळ वातावरण आणि तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने (IMD Goa) वर्तविली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com