Robbery at Mapusa: SBI कर्मचारी म्हणत घातला 2.36 लाखांचा गंडा, अज्ञाताचा शोध सुरू..

Robbery through Scam Call: एका अज्ञात व्यक्तीकडून तब्बल 2.36 लाख रुपयांचा गंडा
Robbery through Scam Call: एका अज्ञात व्यक्तीकडून तब्बल 2.36 लाख रुपयांचा गंडा
Robbery in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa,Goa

म्हापसा: सध्या सगळीकडेच चोरी आणि फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. उत्तर गोव्यातील खांडोळा गावात राहणाऱ्या एका रहिवाश्याची अशीच फसवणूक झाली. या पीडित माणसाला एका अज्ञात व्यक्तीकडून तब्बल 2.36 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आलाय.

आरोपीने सर्वात आधी रिवॉर्ड पॉइंट एक्स्पायर होणार असल्याचा दावा करणारा एक संदेश पाठवला आणि पीडित माणसाला तात्काळ ते रिडीम करण्यास सांगितले.

दिलेल्या क्रमांकावर संपर्क करताक्षणी आरोपीने स्वतः स्टेट बँकचा कर्मचारी असल्याचा आव आणत पीडित माणसाला बँकेची सर्व माहिती देत खाते उघडण्यास प्रवृत्त केले.

Robbery through Scam Call: एका अज्ञात व्यक्तीकडून तब्बल 2.36 लाख रुपयांचा गंडा
Goa Eco Sensitive Zone: आम्ही करायचे काय..? म्हाऊस ग्रामसभेत अतिसंवेदनशील क्षेत्राला विरोध

स्थानिक माणसाची सर्व बँकिंग माहिती मिळताच आरोपीने तीन वेगवेगळे आर्थिक व्यवहार करत संबंधित व्यक्तीच्या खात्यातून 2.36 लाख रुपये काढले.

आपली फसवणूक करण्यात आली आहे हे समजताच पीडित व्यक्तीने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. सध्या पोलिसांकडून या अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास सुरु झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com